• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी का कमी केली? अमेरिकेचा टॅरिफ दबाव नाही तर दुसरचं सर्वात मोठं कारण आलं समोर

February 9, 2026 by admin Leave a Comment


भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारतामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील होताच आता हा तणाव काही अंशी निवळल्याचं दिसत आहे. टॅरिफचा तणाव असताना भारत आणि अमेरिकेमध्ये झालेली ही ट्रेड डील महत्त्वाची मानली जात आहे, कारण या ट्रेड डीलमुळे अनेक समीकरण बंदलणारे आहेत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बुस्ट मिळणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की, भारत आता रशियाकडून तेलाची खरेदी बंद करेल, मात्र यावर भारताकडून अजून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाहीये. मात्र जरी असं असलं तरी देखील भारतानं रशियाकडून तेलाच्या खरेदीच प्रमाण कमी आहे.

एका आकडेवारीनुसार 2024 मध्ये भारत रशियाकडून एकूण गरजेच्या तब्बल 41 टक्के कच्च्या तेलाची खरेदी करत होता. पंरतु हेच प्रमाण कमी करत -करत डिसेंबर 2025 मध्ये भारतानं 31 टक्क्यांवर आणलं आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारातानं हे पाऊल उचललं का? तर असं अजिबात नाहीये. त्यामागे इतर काही कारणं आहेत. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भारताला रशियावरील अवलंबित्व कमी करायंच होतं. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलासाठी रशियावर अवलंबून आहे. मात्र एखाद्या कारणामुळे जर पुरवठा साखळी खंडित झाली तर त्याचा मोठा फटका हा देशाला बसू शकतो, त्यामुळे भारताने हा निर्णय घेतला आहे. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी केली आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन वर्षांपूर्वी रशियावर पश्चिमेकडील देशांनी मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले होते, त्यामुळे रशियात उत्पादीत होणाऱ्या कच्च्या तेलाची निर्यात होत नव्हती, अशा परिस्थितीमध्ये रशियानं भारताला मोठ्या प्रमाणात सूट दिली होती, ज्याचा फायदा हा भारतानं घेतला. परंतु आता रशियानं डिस्काउंटमध्ये हात आखडता घेतला आहे, त्यामुळे हा व्यावसाय आता तोट्याचा होत आहे, त्यामुळे देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला.

युरोपियन युनियनची घोषणा – युरोपियन युनियनमध्ये असलेल्या देशांनी मोठी घोषणा केली आहे, जे देश रशियातून मिळणाऱ्या कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधन बनवतील त्या देशांकडून पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय युरोपियन युनियनने घेतला आहे. हा देखील दबाव असल्यामुळे आता भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 43 वर्षांपूर्वी सनी देओलच्या या चित्रपटाने केला होता बॉक्स ऑफिसवर कब्जा, 3 कोटी बजेटमध्ये केली 130000000 कोटींची कमाई
  • Feng Shui : घरात ठेवा फक्त या चार वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
  • सिग्नलशिवाय धावणारी भारतातील एकमेव ट्रेन, 124 वर्षांपासून हात दाखवताच थांबते
  • अभिनेत्रीच्या नावाने ‘गंदी बात’, व्हॉट्स ॲप चॅट लीक होताच एकच खळबळ, कोण आहे ती?
  • चंद्रग्रहणामुळे होळी आणि रंगपंचमी कधी साजरी करायची ? तर एका क्लिकवर जाणून घ्या योग्य तारीख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in