• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! चीन-अमेरिकेमध्ये युद्धाचा भडका उडणार? ट्रम्प यांचा मोठा निर्णय, थेट फायटर जेटचं उड्डाण, जगभरात खळबळ

January 8, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेनं व्हेनेझुएलावर कारवाई केली, व्हेनेझुएलावर हल्ला करून ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केलं आहे. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा चीनकडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर आता अमेरिकेनं मोठं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. अमेरिकेनं आता थेट त्यांचे अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात उतरवलं आहे. या विमानावरून F-35C स्टेल्थ फाइटर जेट्सनं उड्डाण देखील घेतलं आहे. हे रूटीन पेट्रोलिंग असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे, मात्र ही रूटीन पेट्रोलिंग नसून हा अमेरिकेनं चीनला दिलेला इशारा असल्याचं बोललं जात आहे.

बुधवारी अमेरिकेच्या नौदलाकडून छायाचित्र जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात ऑपरेशन करत असल्याचं दिसून येत आहे. आम्ही दक्षिण चीनी समुद्रात विमानवाहू जहाज तैनात केलं आहे कारण याचा मुख्य उद्देश हा या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे आक्रमण होऊ न देणं तसेच मित्र राष्ट्रांसोबत सैन्यांचा ताळमेळ ठेवणे हा आहे, असं स्पष्टीकरण अमेरिकेच्या सैन्यदलाकडून देण्यात आलं आहे.

दक्षिण चीनी समुद्र का आहे एवढा संवेदनशील?

दक्षिण चीनी समुद्रावरून चीनचे आपल्या शेजारी असलेल्या अनेक देशांसोबत वाद सुरू आहेत. चीनकडून या समुद्राच्या मोठ्या भागावर दावा करण्यात आला आहे. चीनचा या समुद्रावरून फिलिपाईन्ससोबत देखील वाद सुरू आहे, विशेष म्हणजे फिलिपाईन्स हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील प्रमुख भागीदार देश आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेनं उचलेलं हे पाऊल धोकादायक मानलं जात आहे. चीनकडे जगातील सर्वात मोठं नौदल आहे.

दरम्यान चीनकडून अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे, निकोलस मादुरो यांची आणि त्यांच्या पत्नीची सुटका करावी अशी मागणी चीनने केली होती. त्यांनंतर आता अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. मात्र यावर अद्याप चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in