• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! खामेनेईचे दिवस भरले, आता भारताकडूनही युद्धाचे संकेत, कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला, विमानाचं उड्डाण

January 17, 2026 by admin Leave a Comment


इराणमध्ये सध्या मोठं जन आंदोलन उफाळून आलं आहे, लोक थेट तेथील सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामध्ये आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इराणमध्ये मोठी अराजकता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे या आंदोलनाला अमेरिकेचं पाठबळ असल्याचा देखील आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल केलेले वक्तव्य पहाता मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्याकडून तर थेट इराणवर हल्ल्याचा देखील इशारा देण्यात आला होता. दरम्यान इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढत असतानाच आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता इस्रायल आक्रमक भूमिकेत आलं असून, इस्रायलचे अधिकृत सरकारी विमान विंग ऑफ जॉयनने इस्रायलची हद्द सोडली आहे. हे विमान आता भूमध्य सागराकडे झेपावले आहे, कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणवर हल्ला झाल्यास भीषण युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

फ्लाइट डेटानुसार विंग ऑफ जॉयनने दक्षिण इस्रायलच्या जवळ असलेल्या नेवाटिम एअर फोर्स बेसवरून उड्डाण केलं आहे. हे विमान आता थेट दक्षिण भूमध्य सागराच्या दिशेनं झेपावलं आहे. त्यामुळे आता अशी देखील अटकळ बांधली जात आहे की, कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होऊ शकतो, तर दुसरा असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे की, इराणकडून इस्रायलवर हल्ला होऊ शकतो, इराणच्या मिसाईल हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी इस्रायलने हे पाऊल उचललं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील मदतीचं आश्वासन दिल्यामुळे आता तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेईविरोधत वातावरण चांगलंच तापलं आहे.

भारताकडून अ‍ॅडव्हायझरी जारी

दरम्यान आता भारतानं आपल्या इराणमधील नागरिकांसाठी अ‍ॅडव्हाझरी जारी केली आहे. इराणमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे, असुरक्षित वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे इराणमधील भारतीय लोकांनी तातडीने इराण सोडून देशात परतावं अशी अ‍ॅडव्हायझरी भारताकडून जारी करण्यात आली आहे. भारताच्या दूतावासाकडून ही अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे, दरम्यान भारताकडून जारी करण्यात आलेली ही अ‍ॅडव्हायझरी म्हणजे युद्धाचे संकेत मानल्या जात आहेत, कारण इराणमध्ये आता कोणत्याही क्षणी अमेरिका किंवा इस्रायलकडून हल्ला होऊ शकतो अशी शक्यता असल्यानं भारतानं आपल्या नागरिकांसाठी ही अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुधचे होणार ट्रिपल गोचर! या 3 राशींना बंपर लाभ होणार, भरपूर कमाई करणार
  • Budget 2026 : औषधांच्या किंमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची मध्यमवर्गीयांना मोठी भेट
  • Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?
  • Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…
  • आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in