• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना जबर हादरा! एकनाथ शिंदेंनी माजी खासदार फोडला, भाजपलाही मोठा फटका

March 6, 2026 by admin Leave a Comment


राज्यात अलिकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता. याचा चांगला फायदाही सत्ताधारी पक्षातील लोकांना झाल्याचे पहायला मिळाला. अशातच आता निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जबर हादरा दिला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते उन्मेश पाटील यांनी असंख्य कार्यकर्तांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासह भाजपच्याही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उन्मेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

खालील पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश

उन्मेष पाटील यांच्यासोबत आज पंचायत समितीचे माजी सभापती, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपचे माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, भाजपचे माजी नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक चिरागउद्दीन शेख, माजी नगरसेवक गणेश महाले, दिपक देशमुख, सुबोध वाघमारे, गवळी समाजाचे प्रमुख विजू गवळी, ओबीसी समाजाचे संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहीत खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनिता पवार, रत्ना पाटील यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा भगवा झेडा हाती घेतला.

📍 मुंबई |#जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते उन्मेश पाटील यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उन्मेष पाटील यांच्यासोबत आज पंचायत… pic.twitter.com/KP2AErsZBS

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 6, 2026

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

पुढे आपल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीवेळी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आज महायुती सरकारने पूर्ण केले. जे बोलतो ते करुन दाखवणारी शिवसेना आहे. शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, त्यामुळेच दररोज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होत आहेत.

दरम्यान, या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, सुनील चौधरी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घाणेरडी टाकी साफ करण्याची भन्नाट ट्रिक, आत न जाता होईल स्वच्छ, वापरा ही सोपी पद्धत
  • बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
  • आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
  • Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in