• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! इस्त्रायलने थेट मुळावरच घाव घातला; इराणमध्ये हाहाकार, हुकुमाचा एक्काच मारला गेला

March 26, 2026 by admin Leave a Comment


युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी बंद झाल्यानं सध्या जगभरात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांची जहाजं अडकून पडल्यामुळे जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अमेरिकेकडून इराणला हा मार्ग पुन्हा एकदा खुला करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला होता, मात्र इराणकडून अमेरिकेच्या या इशाऱ्याला केराची टोपली दाखवण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इस्त्रायलने होर्मूज स्ट्रेटवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये इराणच्या IRGC चे नौदल प्रमुख अलीरेजा तंगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत इस्त्रायलकडून माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्याबाबत माहिती देताना इस्त्रायलच्या एका उच्चपदस्थ सैन्य अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही होर्मूज स्ट्रेटवर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये इराणच्या विशिष्ट नौदल IRGC चे प्रमुख अलीरेजा तंगसिरी यांचा मृ्त्यू झाला आहे. हा इराणसाठी आणखी एक मोठा झटका मानला जात आहे.

इराणकडे दोन नौदल आहेत, एक इराणी सरकारचं नौदल आहे, तर दुसरं नौदल हे आयआरजीसीचं आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यामध्ये आयआरजीसीचे प्रमुख कमांडर अलीरेज़ा तंगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होमूर्ज बंद करण्यात आल्यानं जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिका आणि इस्त्रायलवर देखील दबाव वाढला आहे. हा दबाव वाढत असतानाच इस्त्रायलने थेट होमूर्जच्या सामुद्रधुनीमध्ये हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कमांडर अलीरेज़ा तंगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत इस्त्रायलकडून माहिती देण्यात आली आहे.

इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार इराणने तेलवाहतूक करणाऱ्या जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे. त्यामुळे आम्ही या सामुद्रधुनीजवळ हल्ला केला, या हल्ल्यामध्ये कमांडर अलीरेज़ा तंगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कमांडर अलीरेज़ा तंगसिरी हे इराणच्या IRGC नौदलाचे प्रमुख होते. या मार्गाने जाणाऱ्या जहाजांची नाकाबंदी करण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र या हल्ल्यात आता त्यांचा मृत्यू झाला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in