• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! इस्त्रायलच्या दूतावासावर अंधाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

April 7, 2026 by admin Leave a Comment


तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये इज्रायलच्या दूतावासाजवळ अंधाधुंद गोळीबार झाला आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दूतावास इस्तांबुलच्या बेसिक्टास भागात आहे. सध्या हे स्पष्ट झालेले नाही की, हल्ला दूतावासाला लक्ष्य करून करण्यात आला होता की इतर कोणत्या गोष्टीला लक्ष्य करण्यात आले होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा दूतावास किमान दोन वर्षांपासून बंद आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला आणि दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. मात्र, तुर्कीच्या NTV आणि CNN तुर्की वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेले तीनही जण हल्लेखोर होते, ज्यांना तुर्की सुरक्षा दलांनी गोळ्या घालून ठार केले. एक हल्लेखोर जखमी अवस्थेत पकडण्यात आला आहे. रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी आपली बंदूक काढताना आणि गोळीबारातून स्वतःला वाचवताना दिसत आहे. एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहे. २०२३ मध्ये इज्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर इज्रायली दूतावासाजवळ मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.

İsrail Konsolosluğu önünde silah sesleri!https://t.co/CLxc6iOmKD pic.twitter.com/VbrxIjdzEp

— Cumhuriyet (@cumhuriyetgzt) April 7, 2026

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खरातच्या फोनच्या लिक झालेल्या CDR प्रकरणी काय होणार? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सस्पेन्स संपवला!
  • 9.0 IMDb रेटिंग, 16 भाग… 8 वर्षांपूर्वी आलेली थ्रिलर सीरीज, वादात अडकली, नंतर बनली प्रेरणा आणि रचला इतिहास!
  • Calling: 10 कशाला? 4 नंबर डायल करून लावा फोन; हे देश कोणते?
  • ‘या’ लोकांसाठी ताक म्हणजे संकटांना आमंत्रण, फायदे नाही फक्त नुकसानच होणार
  • IPL 2026: हा तर फुसका बार निघाला, 25 कोटी घेणारा कमॅरुन ग्रीन पहिल्या 3 सामन्यात फ्लॉप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in