• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! इराणने घेतला धक्कादायक निर्णय, भारत संकटात, जग हादरलं, पुन्हा थेट..

April 9, 2026 by admin Leave a Comment


28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यानंतर इराणकडून ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ले करण्यात आले. या युद्धात जगातील अनेक देश होरपळले जात आहेत. स्थिती गंभीर होती. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अमेरिकेने इराणला युद्ध रोखण्यासाठी करार करण्यावर दबाव दिला. मात्र, शेवटपर्यंत इराण झुकला नाही. या युद्धात फक्त इराणचेच नुकसान झाले असे नाही. अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले. अमेरिकेत महागाई वाढली. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि ब्रिजवर हल्ला करण्याची मोठी धमकी अमेरिकेने दिली होती. यादरम्यान त्यापूर्वीच दोन्ही देशांनी दोन आठवड्याकरिता युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला.

काही गोष्टींवर करार केले. इराणकडूनही होर्मुज खाडी सुरू करण्यात आली होती. मात्र, इस्त्रायलने उचललेल्या धक्कादायक पाऊलामुळे पुन्हा एकदा इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. इस्त्रायलकडून लेबनॉनवर हल्ले केले जात आहेत, हे हल्ले अत्यंत आक्रमक आहेत. लेबनॉनमध्ये युद्धविराम झाल्याशिवाय इराण अमेरिकेसोबत होणाऱ्या इस्लामाबाद येथील चर्चेत सहभागी होणार नाही.

इराणच्या हवाई क्षेत्रात जर शत्रूचे विमान आले तर युद्धविराम उल्लंघन समजले जाईल, असा मोठा इशारा इराणकडून देण्यात आला. फार्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इस्त्रायलकडून लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे आम्ही होर्मुज खाडी बंद करत आहोत. हेच नाही तर इराणने स्पष्ट शब्दात सांगितले की, होर्मुज खाडी परवानगीशिवाय कोणीही ओलांडू नये.

जर इराणच्या परवानगीशिवाय कोणी होर्मुज खाडी पार करत असेल तर थेटपणे आम्ही हल्ले करू.इस्त्रायलने केलेल्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे जग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. इस्त्रायलने केलेल्या लेबनॉनवरील हल्ला 54 नागरिकांचा मृत्यू झाला तर 1 हजारपेक्षा अधिक लोक गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यामुळे इराण पुन्हा भडकल्याचे बघायला मिळत आहे. स्थिती अधिक गंभीर होताना पुन्हा एकदा दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in