• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! इराणचं भारताला आणखी एक मोठं गिफ्ट; मित्राचं तोंडभरून कौतुक, गुजारतबद्दलच्या त्या दोन शब्दांनी तर मनंच जिंकली

April 4, 2026 by admin Leave a Comment


इराण सध्या अमेरिका आणि इस्त्रायलसोबत युद्धात गुंतला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून अनेक देशांसाठी स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. इराणने होर्मूजची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद केल्यानं अनेक देशांमध्ये भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. कारण जगाला जेवढी कच्च्या तेलाची आणि नॅचरल गॅसची गरज लागते, त्यातील सुमारे 25 टक्के वाहतूक ही याच मार्गाने होते. तर भारतामध्ये येणार जवळपास 40 टक्के कच्चं तेल या मार्गाने येतं. मात्र आता इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे त्याचा फटका भारताला देखील बसला आहे. इराने आपल्या काही मित्र देशांसाठी स्ट्रीट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू केला आहे. त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. मात्र या मार्गावर तणाव वाढल्यानं आता पूर्वी इतकी वाहतूक या मार्गाने होत नाहीये.

या सर्व पार्श्वभूमीवर आता इराणमधून भारतासाठी एक गुडन्यूज समोर आली आहे. ग्रीन सानवी नावाचं एक भारतीय जहाज होर्मूज सामुद्रधुनीमधून पार झालं आहे. हे जहाज आता भारताकडे निघालं आहे. हे जहाजं एलपीजी गॅस घेऊन भारताकडे निघालं आहे. या जहाजामध्ये तब्बल 46,650 टन एवढा गॅस आहे. हे युद्ध काळात होर्मजूच्या सामुद्रधुनीमधून सुरक्षितरित्या निघालेलं भारताचं सातवं जहाज आहे. यापू्र्वी सहा जाहाजं भारतामध्ये पोहोचले आहेत, आता हे सातवं जहाज भारताकडे निघालं आहे. मात्र अजूनही भारताचे 17 जहाजं या मार्गावर अडकून पडले आहेत.

दरम्यान याबाबत गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. भारताच्या कुटनीतीचा अजून एक विजय झाला, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान त्यानंतर भारतामधील इराणच्या दूतावासाने हर्ष संघवी यांच्या ट्विटला रिप्लाय देताना भारताचं आणि गुजरातचं कौतुक केलं आहे. भारत आणि खासकरून गुजरातला इराणच्या हृदयात एक खास जागा आहे. यासाठी इराणने 4000 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा दाखला दिला. गुजरातमध्ये लोथल नावाचं एक जुनं बंदर होतं. सिंधु संस्कृतीच्या काळात हे बंदर समुद्री मार्गाने इराणला जोडलं गेलं होतं. याचाच अर्थ भारत आणि इराणमध्ये खूप प्राचीन व्यापारी संबंध आहेत, असं इराणने म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in