• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?

April 11, 2026 by admin Leave a Comment


राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सध्या राज्यात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार आहेत, आणि ते सर्वजण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आणखी एक अशी देखील चर्चा सुरू झाली होती की, हे सर्व खासदार थेट भाजपच्या संर्पकात आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या बड्या नेत्यानं खासगीत बोलताना मोठं विधान केलं आहे. आता वाढले तर खासदार एनडीएचेच वाढतील, भाजपचे खासदार वाढणार नाहीत, कोणत्याही पक्षातील खासदारांना महाराष्ट्र भाजपात नो एन्ट्री असेल, असं खासदार फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका बड्या नेत्यानं खासगीमध्ये विधान केल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार असतील ते फुटणार आहेत, अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.  हे सर्व  खासदार शिवसेना शिंदे गट,  एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.  मात्र त्याचसोबत अशी देखील एक चर्चा सुरू होती, की हे दोन्ही पक्षाचे खासदार थेट भाजपच्या संपर्कात आहेत. पण आता या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्यानं खासगीत मोठं विधान केलं आहे.  आता खासदारांची संख्या वाढली तर ती एनडीएची वाढेल, भाजपच्या खासदारांची संख्या वाढणार नाही. भाजपच्या या नेत्याकडून खासदारांच्या भाजप प्रवेशाला फूल स्टॉप देण्यात आला आहे. याचाच अर्थ आता कुठलंही ऑपरेशन झालं ऑपरेशन तुतारी किंवा ऑपरेशन टायगर जरी झालं तरी देखील या खासदारांना भाजपमध्ये एन्ट्री मिळणार नाहीये.

दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील हे वृत्त फेटाळून लावलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर बोलताना असं काहीही होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?
  • ‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप
  • युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ
  • Horoscope : असा दिवस पुन्हा कधीच येणार नाही, आयुष्य जाईल बदलून; वाचा 12 एप्रिलचे राशिभविष्य!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in