• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अमेरिकेला युद्धात झुकावेच लागणार, इराणच्या मनात वेगळंच काहीतरी, होर्मुझबद्दल आता…

March 22, 2026 by admin Leave a Comment


Iran Israel war : इराण-इस्रायल युद्ध दिवसेंदिवस उग्र रुप धारण करताना दिसत आहे. या युद्धामध्ये कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. विशेष म्हणजे या युद्धात अमेरिकादेखील सहभागी असल्याने त्याचा तडाखा संपूर्ण जगाला बसत आहे. अमेरिकेवर जागतिक पातळीवर दबाव वाढावा यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. हा जागतिक तेलपुरवठ्यासाठी अतिशय महत्त्वाचा जलमार्ग आहे. तर दुसरीकडे जगातील इतर देशांपुढे निर्माण झालेले जलसंकट लक्षात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणला धमकावत आहेत. त्यांनी नुकतेच येत्या 48 तासांत होर्मुझचा मार्ग खुला न केल्यास आम्ही इराणच्या उर्जानिर्मिती केंद्रांवर हल्ला करू, असा इशारा दिला आहे. दरम्यान, आता अमेरिकेच्या या धमक्यांना आता इराण भीक घालत नसल्याचे दिसत आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांनी ट्रम्प यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही

पेझेशकियान यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इराणची भूमिका बोलून दाखवली आहे. आम्ही अशा पोकळ धमक्यांना भीक घालत नाही, असं त्यांनी म्रटलं आहे. आमच्या देशाला जगातील नकाशातून मिटवून टाकण्याची धमकी दिली जात आहे. परंतु अशी धमकी ही इतिहास रचणाऱ्या एका देशाविरोधातील निराशाच दर्शवते, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

The illusion of erasing Iran from the map shows desperation against the will of a history-making nation. Threats and terror only strengthen our unity. The Strait of Hormuz is open to all except those who violate our soil. We firmly confront delirious threats on the battlefield.

— Masoud Pezeshkian (@drpezeshkian) March 22, 2026

हा जलमार्क सर्वांसाठी खुला पण….

पुढे बोलताना त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दलही विधान केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही सर्वांसाठी खुली आहे. पंरतु ज्या लोकांनी आमची जमीन, आमचा हक्क, आमचे अधिकार हिसकावून घेतले आहेत, त्यांच्यासाठी मात्र हा जलमार्ग बंद असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. रणांगणात मिळत असलेल्या धमक्यांचा आम्ही हिमतीने सामना करत आहोत, असेही त्यांनी विश्वासाने बोलून दाखवले आहे.

दरम्यान, आता पेझेशकियान यांचे हे ट्वीट म्हणजे अमेरिकेला थेट उत्तर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावर आता अमेरिका नेमके काय उत्तर देणार? डोनाल्ड ट्रम्प इराणवर आणखी मोठे हल्ले करण्याचा आदेश देणार का? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • Maharashtra News LIVE : लवकरच ‘ऑपरेशन टायगर’? दरेगावातून एकनाथ शिंदे सक्रीय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in