• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धाबाबत पुतिन यांची हादरवणारी भविष्यवाणी; जगभरात मोठी खळबळ, झोप उडाली

March 26, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाला आता चार आठवडे होत आले आहेत. मात्र तरी देखील या युद्धावर अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये. अमेरिकेनं दिलेला युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे. आता आम्ही आमच्या मर्जीने युद्धविराम करू असा थेट इशाराही इराणकडून अमेरिकेला देण्यात आला आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचा पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे. इराणकडून सुरू असलेल्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. दरम्यान या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे.

या इंधन टंचाईचा मोठा फटका हा भारताला देखील बसला आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल चालकांना आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे, तसेच गॅस वेळेत मिळत नसल्यानं सामान्य नागरिकांवर देखील गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभी राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान हे युद्ध असंच सुरू राहिलं तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी मोठं विधान केलं आहे. पुतिन यांच्या या विधानामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले पुतिन?

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामध्ये पुढे काय होईल? हे कोणीही सांगू शकत नाही. जर युद्ध सुरूच राहिलं तर कोरोनामध्ये जसं लॉकडाऊन लागलं होतं, त्याहीपेक्षा भयंकर परिस्थिती संपूर्ण जगावर येऊ शकते, असं पुतिन यांनी म्हटलं आहे. मास्कोमध्ये एका उद्योग परिषदेला संबोधित करताना पुतिन यांनी हे वक्तव्य केलं आहे. या युद्धाचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. या युद्धामुळे पुरवठा, वितरण आणि उत्पादन साखळी बाधित झाली आहे. तसेच जगात मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोलियम पदार्थ आणि खत या सारख्या काही सेक्टवर सध्या प्रचंड दबाव आला आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

हे संकट एवढं भीषण आहे की जर हे युद्ध अजून काही दिवस चाललं तर कोरोणामुळे जेवढं लोकांचं नुकसान झालं नव्हतं, त्यापेक्षा अधिक नुकसान या युद्धामुळे जगाचं होणार आहे. मात्र जे लोक या युद्धात प्रत्यक्ष सहभागी आहेत, त्या लोकांना या गोष्टींचा अंदाज नसावा असं मला वाटत आहे. मात्र हे युद्ध थांबलं नाही तर प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं, असं भाकीत या युद्धाबाबत पुतिन यांनी वर्तवलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इस्लामाबादच्या बैठकीआधीच भारताचा मोठा गेम, रातोरात भारताची अमेरिकेसोबत… काय घडलं दोन देशात?
  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?
  • ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट
  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in