• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अफागाणिस्तानने पाकिस्तानची झोप उडवली, पंतप्रधान कार्यालय थोडक्यात वाचलं, थेट…

February 27, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे, अफगाणिस्तानच्या सौन्यानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केला आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्ता असलेल्या तालिबानचा ड्रोन थेट इस्लामाबादच्या फैजाबाद परिसरापर्यंत पोहोचला आहे. फैजाबाद हा इस्लामाबादमधील अत्यंत पॉश परिसर मानला जातो. याच परिसरामध्ये पाकिस्तानचं एक मोठं सैन्य तळ आहे. तसेच याच परिसरात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कार्यालय देखील आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की, जिथे अफगाणिस्तानने हल्ला केला ते ठिकाण पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केला, या हल्ल्यानंतर अफागाणिस्तानने पाकिस्तानला इशारा देखील दिला आहे. आम्ही आता इस्लामाबादमध्ये हल्ला केला आहे, लवकरच आमचे शस्त्रास्त्र आणि सौनिक पाकिस्तानच्या मुंडक्यापर्यंत पोहोचू शकतात, असं अफगाणिस्तानने म्हटलं आहे.

अफागाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी शुक्रवारी आपल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, आम्ही पाकिस्तानमधील अनेक सैन्य तळावर हल्ला केला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केला, त्याचा बदला आम्ही पाकिस्तानवर ड्रोन हल्ला करून घेतला आहे, आमचा संदेश स्पष्ट आहे की आमचे हात केव्हाही त्यांच्या मुंडक्यापर्यंत पोहोचू शकतात.

पंतप्रधानांचं कार्यालय सुरक्षित नाही?

तालिबानने सुसाइड ड्रोन आणि एअर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या इस्लामाबादमधल्या फैजाबाद येथे असलेल्या सैन्य तळांवर हल्ला केला आहे. या ठिकाणावरून पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कार्यालय अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांचं कार्यालयच या हल्लापासून सुरक्षित नसल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या या हल्ल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानकडून आता आफगाणिस्तानवर आणखी मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा

दरम्यान आफगाणिस्तानने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानकडून थेट युद्धाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्ताननचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मोठं विधान केलं आहे, आता आम्ही हे सहन करणार नाही, आम्ही आमच्या विरोधात
सुरू केलेलं हे युद्ध समजतो, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश
  • Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in