• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अखेर ती बातमी आलीच, अमेरिकेमधून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, जयशंकर यांची मोठी घोषणा

February 5, 2026 by admin Leave a Comment


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या दौऱ्याचा समारोप करताना सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अमेरिकेचा हा दौरा खूपच पॉझिटिव्ह होता. तसेच त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार देखील मानले आहेत. जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारत आणि अमेरिकेमधील ट्रेड डील आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. काही तांत्रिक आणि औपचारिक बाबी बाकी आहेत, त्यांना लवकरच पूर्ण केलं जाईल, या ट्रेड डीलमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, तसेच व्यापाराचा एक नवा अध्याय या ट्रेड डीलमुळे सुरू होणार आहे.

पुढे बोलताना जयशंकर यांनी असं देखील म्हटलं की, ही ट्रेड डील केवळ व्यापारापुरती मर्यादीत नाहीये, तर याचा परिणाम हा अमेरिका आणि भारताच्या धोरणात्मक संबंधांवर देखील होणार आहे. या डीलमुळे अमेरिका आणि भारतामध्ये लाँग टर्म पार्टनशिप तयार होईल. ही डील तत्रंज्ञानाच्या दृष्टीने देखील महत्त्वाची असणार आहे, तसेच उत्पादन आणि वितरण साखळी सुरळीत ठेवण्यासाठी देखील याचा मोठा फायदा होणार आहे.

 

Concluded a productive and positive visit to the US. Thank Secretary Rubio for his warm hospitality.

The historic India-US trade deal is in the final stages of detailing that will be completed very soon. It opens up a new phase in our bilateral ties, with vast possibilities for… pic.twitter.com/r3O20XJL90

— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 5, 2026

दरम्यान त्यापूर्वी भारतानं युरोपियन यूनियनसोबत देखील मोठी ट्रेड डील केली आहे. या ट्रेड डीलमुळे भारताची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे, तसेच या ट्रेड डीलनंतर युरोपियन राष्ट्रांकडून भारताच्या अनेक वस्तुंवरील टॅरिफ हटवण्यात आला आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये झालेल्या या ट्रेड डीलचा सर्वात जास्त फटका हा भारताच्या शेजारी असलेल्या बांग्लादेश आणि पाकिस्तानला बसणार आहे, या ट्रेड डीलमुळे पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील कापड व्यावसाय हा मोठ्या संकटात सापडला आहे. अमेरिकेसोबतची ट्रेड डील अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ दर काही टक्क्यांनी कमी केला आहे, दरम्यान या ट्रेड डीलनंतर आता भविष्यात टॅरिफ आणखी कमी होऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी माफी मागणार नाही, कुणाल कामराने दिला बाळासाहेब ठाकरेंचा दाखला, नेमकं काय घडलं?
  • Maharashtra Weather Updates : आज दुपारी घरातच थांबा, 12 ते 4…, राज्यात आजपासून सुरू होणार उष्णतेचं टॉर्चर
  • इराणने मारली बाजी! ट्रम्प यांच्या एका पोस्टमुळे मोठे नुकसान, नेमकं काय घडलं?
  • Horoscope Today 12th April 2026 : रविवारी मिळणारी नशीबाची साथ, या 3 राशींना आज मिळणार तगडा फायदा, वाचा आजचं भविष्य
  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in