• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठं संकट! अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा, तब्बल इतके..

April 13, 2026 by admin Leave a Comment


पुढील 5 दिवस राज्यासाठी संकटाची आहेत. शक्यतो अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर दुपारी 12 नंतर पडणे टाळा. यादरम्यानच पुणे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला. पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 – 45 पार जाण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अकोला जिल्ह्याचा पारा आज 43 वर तर पुढील दोन दिवसात 45 अंशावर जाण्याची शक्यता आहे. अमरावती – 42 पुढील दोन दिवसात 45 जाण्याची शक्यता.विदर्भासह मध्यमहाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 पार. नागरिकांनी पुढील 5 दिवस विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दोन दिवसांनंतर विदर्भातील जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

तळकोकणामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आठ दिवसापासून नागरिक अति उष्णतेने हैराण देखील झाले होते. जवळपास 36 °ते 38 ° अंश इतका पारा वाढलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे कमालीचं तापमानामध्ये वाढ देखील झाले होती. त्याचाच परिणाम म्हणून आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते.

त्यामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जर अवकाळी पाऊस झाला तर असलेलं आंबा आणि काजू पिकावर मोठा परिणाम होऊ शकतो. अवकाळीनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा; मालेगावचा पारा 41.04 वर, उकाड्याने नागरिक हैराण. अवकाळी पावसाने काही दिवसांपूर्वी मालेगावात हजेरी लावल्यानंतर उकाड्यापासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांना होते. मात्र पावसानंतर पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला असून मालेगावचा पारा तब्बल 41.04 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.

कडक उन्हामुळे मालेगावकर अक्षरशः हैराण झाले असून दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे अनेकांनी टाळले आहे. दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे तसेच पाण्याचे सेवन वाढवावे, असे आवाहनही आरोग्य तज्ञांकडून करण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यात जून काही सूर्य आग ओकत असून तापमान चाळीशी पार पोहोचलय. या वाढत्या उष्णतेचा फटका केळी बागांनाही बसत असून केळीच्या बागा करपून जात आहेत. अर्धापुर, मुदखेड नांदेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. शिवाय पाण्याची पातळी देखील खालावली जात असल्याने केळीला पाणी कमी पडत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झालीय…

नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर परिणाम जाणवू लागला असून गजबजलेल्या रस्त्यांवरही ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या तीव्र तापमानाचा फटका नव्याने लागवड केलेल्या फळबागांनाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने उष्माघात कक्ष सुरू करत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

वाढत्या तापमानाचा शेती कामांवर परिणाम. वाढत्या उन्हामुळे शेतात दुपारच्या सुमारास कामांना ब्रेक. सकाळच्या सुमारास शेतीची कामे करण्याचा प्रयत्न. उन्हाळी, भाजीपालावर्गीय पिकांचं सिंचन, निंदन आदी काम सकाळच्या प्रहरात करण्यात येतात. तिळ पिकाला सकाळच्या सुमारास सिंचन, निंदन. दुपारी उन्हाच्या तीव्रतेत वाढ होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन एन. चंद्रशेखर म्हणाले, गैरवर्तनाबाबत आम्ही…
  • 0..2..4..6 आणि 91! कर्णधार इशान किशनचा झंझावात, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना झोडलं
  • SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ
  • Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे हे 15 विचार वाचताच तुमचं अख्खं आयुष्य हमखास बदलेल, 5 वा विचार वाचून…
  • ‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in