• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठं मन… स्वस्त थाळी…, अरिजीत सिंगच्या हॉटेलमध्ये मिळतं पोटभर जेवण, मन्यूमध्ये काय असतं?

February 3, 2026 by admin Leave a Comment


Arijit Singh Restaurant Heshel: प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून संन्यास घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अरिजीत याने पार्श्वगायनातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. भारतीय चित्रपट संगीतातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या आवाजांपैकी एक, अरिजीत सिंग याने त्यांच्या चाहत्यांचे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर असलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले. पार्श्वगायक म्हणून आता कोणताही नवीन प्रकल्प हाती घेणार नसल्याचं देखील त्याने स्पष्ट केलं… सांगायचं झालं तर, अरिजीत फक्त त्यांच्या आवाजामुळे नाही तर, अन्य काही कारणांमुळे देखील चर्चेत असते.

अरिजीत सिंग त्याच्या हॉटेलमुळे देखील चर्चेत असते. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे स्वतःचे हॉटेल आहे. शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, सुनिल शेट्टी, मलायका अरोरा, गौरी खान यांचे आलिशान हॉटेल आहेत. जेथे अनेक महागडे पदार्थ मिळतात. पण अरिजीत याच्या हॉटेलमध्ये अत्यंत कमी किंमतीत भरपेट जेवण मिळतं.

अरिजीत सिंगने सामान्य लोकांसाठी ‘हेशेल’ नावाचे हॉटेल उघडलं आहे. पश्चिम बंगालमधील अरिजीतच्या मूळ गावी मुर्शिदाबाद येथील जियागंज येथे त्याने हे हॉटेल सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये फक्त 40 रुपयांत एक व्यक्ती पोटभर जेवू शकतो… अरिजित सिंगचं जुनं हॉटेल आहे. हे हॉटेल त्यांचे वडील गुरुदयाल सिंग हे सांभाळतात. एवंढच नाही तर, या उद्योगात अरिजीत सिंग देखील सक्रिय आहे.

अरिजीत सिंग याच्या हेशेल हॉटेलमध्ये मेन्यू

अरिजीत सिंग याच्या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं. शाकाहारी मेन्यूमध्ये मिक्स व्हेज (150 रुपये), व्हेज हांडी (170 रुपये), नवरत्न कोरमा (80 रुपये), आलू जीरा (100 रुपये) आणि शाही पनीर (190 रुपये), तर मांसाहरी मेन्यूमध्ये चिकन कोरमा (180 रुपये), चिकन चाप (200 रुपये), चिकन रेजाला (180 रुपये), चिकन कस्सा (160 रुपये), चिकन पटियाला (200 रुपये) आणि चिकन टिक्का मसाला (370 रुपये) सामिल आहे. असं सांगण्यात येतं. पण याबद्दल अधिकृत माहिती नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rahul Gandhi: ‘मी काय बोलावं हे पण तुम्हीच सांगा’ राहुल गांधींचा लोकसभेत संताप, ओम बिर्लांचं तडक उत्तर काय?
  • Ajit Pawar: तुमचा बायोपिक आला तर कुणी भूमिका करावी? अजितदादांनी कोणत्या अभिनेत्याचं घेतलं होतं नाव?
  • Ajit Pawar: मराठी अभिनेत्याने दाखवून दिलेली दादांची एक चूक, ‘तो’ Video पाहून म्हणाल…
  • जेवताना घाम येतोय? कुठल्या गंभीर आजाराचे लक्षण आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं वाचा…
  • Praful Patel: दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनि‍करण? प्रफुल पटेल यांचा मोठा बॉम्ब, राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठे वक्तव्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in