• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती समोर, जेव्हा आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला तेव्हाच…, मोठी खळबळ

April 11, 2026 by admin Leave a Comment


इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये 40 दिवस भीषण युद्ध सुरू होतं. अखेर आता युद्धविरामाची घोषणा झाली आहे. या 40 दिवसांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, इराणची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर पहिला हल्ला केला आणि त्यानंतर या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. दरम्यान त्यानंतर युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी 1 मार्चला इस्त्रायल आणि अमेरिकेनं संयुक्त रित्या इराणवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. आयतुल्लाह अली खामेनेई यांची युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये आयतुल्लाह अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही लोकांचा देखील मृत्यू झाला.

दरम्यान आयतुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणकडून आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा करण्यात आली. मोजतबा खामेनेई हे इराणचे नवे सर्वोच्च नेते बनले. मात्र आता मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामनेई यांच्या सर्वात जवळच्या सूत्रांनी ही माहिती रॉयटर्सला दिली आहे. जेव्हा आयतुल्लाह अली खामेनेई यांच्यावर हल्ला करण्यात आला, तेव्हाच मोजतबा अली खामेनेई देखील हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांचा चेहरा पूर्णपणे बिघडला होता, पायाला गंभीर दुखापत झाली होती. तर या हल्ल्यात आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे उपचारानंतर मोजतबा खामनेई यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा झाली असून, त्यांनी आता इराणची सूत्रं आपल्या हातात घेतली आहेत. ते स्वत: निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. तसेच गेल्या काही दिंवसांपासून ते इराणच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये देखील सहभागी होत आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फ्लॉवर की कोबी…कोणती भाजी आहे पौष्टिक? जाणून घ्या दोन्हींमधील पोषक तत्वे आणि आरोग्यदायी फायदे
  • चीनचा गुपचूप मोठा गेम, इराणला… अमेरिकेची झोप उडवणारी गुप्त माहिती समोर; युद्ध सुरू…
  • Multibagger Stock :पाच वर्षांत एकदम सैराट; 7100 टक्क्यांनी हा शेअर धावला, आता दिग्गजांची गुंतवणुकीसाठी धावाधाव
  • कसे असतात दोन्ही भुवया जोडलेले लोक? स्वभाव ऐकून तुम्ही देखील…
  • 6,6,6,6,6,4,4,4,4,4 अभिषेक शर्माचा झंझावात, पंजाब किंग्सविरुद्ध 18 चेंडूत ठोकलं आक्रमक अर्धशतक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in