• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मेंदू निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात या सुपरफूडचं करा समावेश

March 1, 2026 by admin Leave a Comment


आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीची पूर्ण काळजी घेतो, पण संपूर्ण शरीर चालवणाऱ्या भागाला आपण विसरतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्याप्रमाणे कारला चांगले इंधन लागते, त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला काम करण्यासाठी पोषणाची आवश्यकता असते? आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये एखादी गोष्ट किंवा वस्तू कुठे ठेवलीये तसेच अनेक कामात विसण्याचे प्रकार जास्त दिसून येत आहे. कामात एकाग्रतेचा अभाव असो किंवा मुलांमध्ये कमकुवत स्मरणशक्ती असो , या सर्वांसाठी तुमचा आहार महत्त्वाचा मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया मेंदू निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करणे महत्वाचे आहे.

मन निरोगी ठेवण्यासाठी काय खावे –

1. अक्रोड-

अक्रोड हे मानवी मेंदूसारखेच असते आणि मेंदूसाठी ते अत्यंत फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते केवळ स्मरणशक्ती सुधारण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी देखील फायदेशीर आहेत.

2. हळदीचे दूध-

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग असते. ते नवीन मेंदूच्या पेशी तयार करण्यास आणि नैराश्यासारख्या समस्यांपासून बचाव करण्यास मदत करू शकते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट हळदीचे दूध प्यायल्याने झोप चांगली येते आणि मेंदू निरोगी राहतो.

3. हिरव्या पालेभाज्या-

पालक, मेथी यांसारख्या भाज्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. या भाज्या मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

4. भोपळ्याच्या बिया-

भाजी बनवताना आपण अनेकदा भोपळ्याच्या बियांचा वापर करतो. पण या बिया जस्त आणि मॅग्नेशियमचे एक पॉवरफुल केंद्र आहेत. मॅग्नेशियम शिकण्याची क्षमता वाढवू शकते आणि जस्त मेंदूच्या नसांना सिग्नल प्रसारित करण्यास मदत करू शकते.

5. डार्क चॉकलेट

जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर डार्क चॉकलेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात, जे मेंदूच्या त्या भागात रक्त प्रवाह वाढवतात जिथे आपण गोष्टी लक्षात ठेवतो.

6. बदाम

बदाम हे स्मरणशक्ती वाढवणारे एक उत्तम साधन मानले जाते. त्यात असलेले व्हिटॅमिन ई स्मृतिभ्रंश रोखण्यास मदत करते.

7. ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात, जे मेंदूची जळजळ कमी करण्यास आणि मेंदूचे कार्य राखण्यास मदत करू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?
  • अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करणे का शुभ आहे? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..
  • ‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू
  • तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी? एका झटक्यात ओळखा, जंगलामध्ये आदिवासी वापरतात ही सोपी ट्रीक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in