• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुसलमान आहे म्हणून अडचणी…, हिंदू आणि मुस्लीम धर्माबद्दल ए.आर. रेहमान यांचं मोठं वक्तव्य

January 17, 2026 by admin Leave a Comment


ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ते कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ए. आर. रेहमान यांनी किरयर आणि धार्मिक विश्वासाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, रेहमान यांनी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमात केलेल्या कामाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालेलं आहे. याच कारणांमुळे इंडस्ट्रीमध्ये राजनिती होते.. असं देखील ए. आर. रेहमान म्हणाले आहेत.

‘रामायण’ सिनेमावर काय म्हणाले रेहमान?

‘रामायण’ सिनेमावरील अल्बम तयार करण्यात त्यांच्या धार्मिक श्रद्धेची भूमिका होती का, असं रेहमान यांना मुलाखतीत विचारण्याच आलं. यावर रेहमान म्हणाले, ‘मी ब्राह्मण शाळेत शिक्षण घेतलं आहे. प्रत्येक वर्षी रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या आहेत. लोकं वाद घालू शकतात. पण मी फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींना महत्त्व देतो… त्या कोणी शिकल्या आहेत.. याला जास्त महत्त्व नसतं…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jay Pirabakaran (@jayprints)

 

रेहमान पुढे म्हणाला, ‘पैगंबर यांनी सांगितलं होतं की, ज्ञान अनमोल आहे, मग ते राजाकडून मिळालं असेल किंवा भिकाऱ्याकडून… चांगल्या गोष्टींमधून किंवा वाईट गोष्टींमधून… कधी कोणत्या प्रसंगातून पळवाट काढू नये. आपण लहान विचारसरणी आणि स्वार्थाच्या पलीकडे जायला हवं. जेव्हा आपण उंचावर जातो तेव्हा आपण चमकतो, आपण प्रकाशतो आणि तेच महत्त्वाचं आहे. मला संपूर्ण प्रकल्पाचा अभिमान आहे, मी मुस्लीम आहे आणि रामायण हा हिंदू ग्रंथ आहे.’ असं देखील ए. आर. रेहमान म्हणाले.

‘रामायम’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर रवी दुबे, सनी देओल, काजल अग्रवाल, अरुण गोविल आणि इंदिरा कृष्णन यांनी देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऐश्वर्या रायबद्दलची ही गोष्ट 99 टक्के लोकांना माहिती नाही, ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
  • प. पू. महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्मजयंती महोत्सव थाटात संपन्न, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सन्मान
  • शनी देवाची मूर्ती ठवू की नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण…
  • या फळांचे पाणी आरोग्यासाठी वरदान, होतील ‘हे’ आश्चर्यचकीत करणारे फायदे
  • WPL 2026: अंतिम सामन्यात आरसीबीचा प्रतिस्पर्धी कोण असेल? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in