• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुलींशी असं वागणं अत्यंत घृणास्पद आणि…, युजवेंद्र चहल सोबत अफेअरच्या चर्चा, प्रसिद्ध सेलिब्रिटीचा संताप

February 2, 2026 by admin Leave a Comment


भारताचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. आता देखीय युजवेंद्र त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आता देखली टीव्ही विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत नाव युजवेंद्र यांच्यासोबत जोडलं जात आहे. त्यांचा एक AI फोटो देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ही सेलिब्रिटी दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक आणि होस्ट शेफाली बग्गा आहे. आता व्हायरल होत असलेल्या फोटोवर शेफाली हिने संताप व्यक्त केला आाहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे होस्ट शेफाली बग्गा संतापली, ज्यामध्ये तिचं नाव एआय-जनरेटेड पोस्टरमध्ये क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत जोडलं गेलं होतं. फोटोमध्ये युवराज याच्यासोबत धनश्री वर्मा, आरजे महावश आणि शेफाली यांचा एकत्र फोटो असून त्यावर ‘किस किस को प्यार करु…’ असं लिहिलं आहे.

या फोटोवर प्रतिक्रिया देत शनिवारी शेफाली हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर संताप व्यक्त केला. ‘हे अत्यंत घृणास्पद आहे! हे ट्रोल मुलींशी ज्या पद्धतीने वागतात ते पूर्णपणे लज्जास्पद आहे. तुमचे आयुष्य जगा. हे आपल्या मानसिकतेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे.’

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ह एआय जनरेटेड पोस्टर्स ग्राफिक डिझायनर विजय कुमार बारिया याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यामुळे शेफाली आणि युजवेंद्र यांच्या अफेअरच्या चर्चांनी आणखी जोर धरला.

सांगायचं झालं तर, शेफाली आणि युजवेंद्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर तेव्हा धरला जेव्हा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यांना मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिलं. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आणि गॉसिप पेजवर चर्चा सुरू झाली. पण, दोघांनीही त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही.

युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा

क्रिकेटर युजवेंद्र चहल याच्यासोबत घटस्फोट झाल्यामुळे कोरियेग्राफर आणि अभिनेत्री धनश्री वर्मा तुफान चर्चेत असते घटस्फोटाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर धनश्री हिने खासगी आयुष्यावर वक्तव्य करत युजवेंद्र यांच्यावर आरोप केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटापूर्वी धनश्री आणि युजवेंद्र हे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत होते . मुंबई उच्च न्यायालयाने वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आणि दोघांचा घटस्फोट मंजूर झाला. घटस्फोटानंतर युजवेंद्र याच्या नावाची चर्चा आरजे महावश हिच्यासोबत रंगलेली. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in