• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला

April 10, 2026 by admin Leave a Comment


Prakash Abitkar on Eknath Shinde: एकीकडे ऑपरेशन टायगरच्या बातम्यांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव सेनेचे 8 खासदार फोडण्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या दरे गावात आहेत. तिथूनच हे ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर उद्धव सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्याला तोडीस तोड उत्तर दिले आहे. याच दरम्यान राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विधानाने महायुतीत शिलगली आहे. त्यांच्या वक्तव्याने महायुतीमधील जुन्या जखमांवरील खपली तर दूर झाली नाही ना याची चर्चा आता होत आहे.

मुख्यमंत्री पदापेक्षा शिंदेंचं नाव देशात मोठं

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नायक चित्रपटातील अनिल कपूर यांच्याप्रमाणे काम केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आली. या सत्तेत एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे हे नाव देशात फार मोठे आहे. त्यांची प्रचंड मेहनत आणि काम या जोरावर सगळी पदे त्यांच्याकडे चालत येतील याविषयी शंका नाही असे कौतुक आबिटकर यांनी केले. ते धाराशिवमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री पदापेक्षा शिंदे यांचे नाव मोठे आहे, हे विधान त्यांनी केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सत्ता स्थापनेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे या गावी होते. त्यावेळी शिवसेनेला सुद्धा अडीच वर्षांकरीता मुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी झाल्याचा दावा करण्यात येत होता. आजही मुख्यमंत्री दरे गावी आहेत आणि त्याचवेळी प्रकाश आबिटकर यांनी मोठे विधान केले आहे. हा निव्वळ योगायोग असला तरी मुख्यमंत्री पद न मिळाल्याची बोचणी यानिमित्ताने पुढे आल्याचा चिमटा विरोधकांनी काढला आहे.

भाकरी फिरवली जाणार

त्याचवेळी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवतील या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. काम करेल त्याला संधी मिळणार, भाकरी फिरवली जाणार, असे एकनाथ शिंदे म्हणतात, असे आबिटकर यांनी सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची विकेट पडलेली असताना आणि काहींची नावं वादात अडकल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?
  • Operation Tiger: विकली जाणारी औलाद… ‘ऑपरेशन टायगर’ चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया, शिंदे सेनेते कोण कोण जाणार?
  • Supriya Sule : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याचं खापर सुप्रिया सुळे यांनी कोणावर फोडलं?
  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in