
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका हाय प्रोफाईल पार्टीत जेवण करणं तरूण-तरूणीला महागात पडलं आहे. एका हाय प्रोफाईल पार्टीत जेवण केल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अन्नातून विषबाधा झाल्याने या दोघांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एका तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत अनेकांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पार्टीतील जेवणामुळे दोघांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका हाय प्रोफाईल पार्टीत अन्नात विषबाधा झाल्यामुळे एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला, तर एका तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर वनराई पोलिसांनी पार्टीच्या आयोजकासह पाच जणांना अटक केली आहे ज्यामध्ये बहुतेक विद्यार्थी आहेत. आता या सर्वांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अनेकांची प्रकृती बिघडली
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये एका हाय-प्रोफाईल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थी आणि तरुण मुले व मुली सहभागी झाले होते. पार्टीमध्ये ड्रिंक आणि खाद्यपदार्थ सेवन केल्यानंतर अनेक लोक अचानक आजारी पडले. घटनेनंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत.
मादक पदार्थांच्या अतिसेवनामुळे घटना घडल्याची शक्यता
अशाही माहिती समोर आली आहे की, मादक पदार्थांच्या अतिसेवनामुळे ही घटना घडली आहे, या पार्टीत ड्रग्जचेही सेवन करण्यात आल्याचा आरोप आहे. हे हाय-प्रोफाईल प्रकरण उघडकीस आल्यानंतर, वनराई पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. आता या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. या पार्टीत नेमके कोणते ड्रग्सचे सेवन करण्यात आले? हे ड्रग्स कुठून आणले? याबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे.
Leave a Reply