
आंतरराष्ट्रीय युद्धाचे थेट परिणाम आता मुंबईवरही जाणवू लागले आहेत. इराण, इजराईल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. यामुळे मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत असून, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना मोठा फटका बसत आहे.
मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये 19 किलो आणि 5 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तेल विपणन कंपन्यांनी थांबवला आहे. चेंबूर येथील एचपी गॅस कंपनीबाहेर गॅस रिफिल करण्यासाठी आलेल्या शेकडो गाड्यांना रिकामे परतावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्याचे कंपनी कर्मचाऱ्यांनी सांगितले. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सुमारे 115 रुपयांची वाढ झाली असून, घरगुती सिलेंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास 50% हून अधिक हॉटेल्स बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply