• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईत मोठी खळबळ, विधानभवन उडवून देण्याचा ई-मेल; कामकाजापूर्वी काय घडलं?

March 12, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील विधानभवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढले. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आत येण्यास मनाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकीकडे इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेचा संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईतील विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

सध्या मुंबई पोलिसांचे विशेष पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) यांची सध्या विधानभवन परिसराची कसून तपासणी सुरु आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने परिसरात अनेक नेते, आमदार आणि राजकीय नेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ही धमकी मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधील सर्व सामान्य नागरिकांना त्वरित बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in