• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईच्या या भागात माधुरी दीक्षित हिचे ऑफिस, तब्बल इतके लाख भाडे आणि…

March 28, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असलेले नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. यासोबतच अनेक रिअॅलिटी शोमध्येही माधुरी दीक्षित हजेरी लावत आहे. माधुरीला धडकन गर्ल म्हणूनही ओळखले जाते. माधुरी दीक्षितच्या साैदर्यावर अनेकजण घायाळ आहेत. माधुरीने एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे आताही तिची एक क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. माधुरीचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. माधुरी दीक्षित सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. यादरम्यानच आता माधुरीने मोठी खरेदी केली. मुंबईच्या लोअर परेल भागात तिने एक आलिशान ऑफिस भाड्याने घेतले. विशेष म्हणजे या ऑफिसला किराया असा तसा नसून खूप जास्त आहे. लोअर परेलच्या अत्यंत महत्वाच्या भागात माधुरीने हे ऑफिस पाच वर्षांकरिता किरायाने घेतले.

मोठे डिपॉझिटही माधुरी दीक्षितने या ऑफिसकरिता मोजले आहे. माधुरी दीक्षित हिने लोअर परेलच्या वन लोढा प्लेस या इमारतीमध्ये आपले नवीन ऑफिस खरेदी केले. माधुरीने 5 वर्षांच्या कराराकरिता 2. 81 कोटी रूपडे भाडे दिले. यासोबतच 17 लाख रूपये सिक्युरिटी डिपॉझिट तिने भरला आहे. 72,600 रूपये स्टॅम्प ड्युटी देखील माधुरी दीक्षितकडून भरण्यात आली.

फक्त ऑफिसच नाही तर एक कार पार्किंगही मिळाली आहे. या करारानुसार, भाड्यात दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या पाच वर्षात भाडे 5 लाखाच्या पुढे जाणार आहे. वरळी येथे माधुरी दीक्षितने सी व्ह्यू अपार्टमेंट खरेदी केली होती. त्यानंतर जवळपास त्याच परिसरात माधुरी दीक्षितकडून ही मोठी खरेदी करण्यात आली. अनेक वर्ष विदेशात राहिल्यानंतर आता कुठे पुन्हा माधुरी दीक्षित भारतात व्यावसायात सक्रिय होताना दिसत आहे.

लग्न झाल्यानंतर माधुरी दीक्षित अनेक वर्ष विदेशात राहिली. आता पुन्हा ती पतीसोबत भारतात आलीये. माधुरी दीक्षितच्या पतीचे एक युट्यूब चॅनलही आहे, या युट्यूब चॅनलवर फिटनेसबद्दल काही टीप्स दिल्या जातात. माधुरी दीक्षित भारतात आली तरीही तिचे दोन्ही मुले विदेशातच असल्याचे सांगितले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in