• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत उलगडणार नवा अध्याय; नव्या कलाकारांची एण्ट्री

March 6, 2026 by admin Leave a Comment


स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांचा बालपणातील प्रवास त्यांचा विवाहसोहळा फुलेवाड्यातील प्रसंग सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न आणि जोतीरावांची शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड या सर्व टप्प्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांचा बालपणातील प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न आणि जोतीरावांची शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड या सर्व टप्प्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

आता ही मालिका एका महत्त्वाच्या वळणावर येत आहे. लवकरच प्रेक्षकांना सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा अध्याय अनुभवायला मिळणार आहे. या टप्प्यात समाजातील रूढी-परंपरांची आव्हानं आणि सावित्रीबाईंनी शिकावं स्वावलंबी व्हावं यासाठी जोतीरावांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.

आता ही मालिका एका महत्त्वाच्या वळणावर येत आहे. लवकरच प्रेक्षकांना सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा अध्याय अनुभवायला मिळणार आहे. या टप्प्यात समाजातील रूढी-परंपरांची आव्हानं आणि सावित्रीबाईंनी शिकावं, स्वावलंबी व्हावं यासाठी जोतीरावांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.

सावित्रीबाईंना शिक्षणाची वाट खुली करून देण्यासाठी जोतीरावांनी दाखवलेली दूरदृष्टी समाजाच्या चौकटी मोडण्याचं धैर्य वाखाणण्याजोगं आहे. नव्या पीढीसाठी मालिकेतलं हे पर्व नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. या नव्या टप्प्यात सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत.

सावित्रीबाईंना शिक्षणाची वाट खुली करून देण्यासाठी जोतीरावांनी दाखवलेली दूरदृष्टी, समाजाच्या चौकटी मोडण्याचं धैर्य वाखाणण्याजोगं आहे. नव्या पीढीसाठी मालिकेतलं हे पर्व नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. या नव्या टप्प्यात सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत.

त्यांच्या प्रभावी अभिनयातून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी कथा अधिक सशक्तपणे उलगडताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री राजसी भावे म्हणाली मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत असलेल्या तक्षा शेट्टीने ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळे तिच्याकडून खूप गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. ही भूमिका फार मनाच्या जवळची आहे. थोड्या काळासाठी का होईना ती साकारायला मिळणं पर्वणी आहे माझ्यासाठी.

त्यांच्या प्रभावी अभिनयातून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी कथा अधिक सशक्तपणे उलगडताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री राजसी भावे म्हणाली, “मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत असलेल्या तक्षा शेट्टीने ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळे तिच्याकडून खूप गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. ही भूमिका फार मनाच्या जवळची आहे. थोड्या काळासाठी का होईना ती साकारायला मिळणं पर्वणी आहे माझ्यासाठी.”

अभिनेता अभिषेक देशमुख म्हणाला इतकं महान व्यक्तिमत्त्व साकारायला मिळतंय याचा आनंद गगनात मावत नाहीये. मी या मालिकेचा मोठा चाहता आहे. पहिल्या एपिसोडपासून ही मालिका मी न चुकता पाहतोय. मालिकेची कथा खूप अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्वक लिहिलेली आहे. त्यामुळे जेव्हा जोतीरावांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा वेगळा अभ्यास करावा लागला नाही. मालिकेच्या कथेतूनच माझा सराव आणि अभ्यास झाला.

अभिनेता अभिषेक देशमुख म्हणाला, “इतकं महान व्यक्तिमत्त्व साकारायला मिळतंय याचा आनंद गगनात मावत नाहीये. मी या मालिकेचा मोठा चाहता आहे. पहिल्या एपिसोडपासून ही मालिका मी न चुकता पाहतोय. मालिकेची कथा खूप अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्वक लिहिलेली आहे. त्यामुळे जेव्हा जोतीरावांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा वेगळा अभ्यास करावा लागला नाही. मालिकेच्या कथेतूनच माझा सराव आणि अभ्यास झाला.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in