• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी तिला किस करणार नाही..; संजय दत्तने या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करण्यास थेट दिला नकार, ऐकून भडकले वडील

March 13, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री पूजा भट्टने वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याच चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. तिने ‘सडक’, ‘दिल है की मानता नहीं’ आणि ‘जख्म’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. परंतु आजपर्यंत ती ‘सडक’ या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा विसरली नाही. कारण या चित्रपटात अभिनेता संजय दत्तने तिच्यासोबत रोमँटिक सीन करण्यास थेट नकार दिला होता. ही गोष्ट इथवरच थांबली नाही, तर त्यावरून महेश भट्ट यांनी संजूबाबाला ‘ढोंगी’ असं म्हटलं होतं. संजय दत्तने पूजा भट्टसोबत किसिंग सीन करण्यास नकार दिल्यावर महेश भट्ट भडकले होते. “जर तू माझ्या मुलीसोबत किसिंग सीन करू शकत नाही, तर पडद्यावर दुसऱ्या कोणाच्याच मुलीसोबत किसिंग सीन करण्याचा तुला हक्क नाही”, अशा शब्दांत त्यांनी संजयला फटकारलं होतं. पूजा भट्टने तिच्या पॉडकास्टमध्ये हा किस्सा सांगितला आहे.

पूजाने करिअरच्या सुरुवातीला ‘सडक’मध्ये काम केलं होतं आणि यामध्ये तिच्यासोबत संजय दत्तची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात दोघांचा एक रोमँटिक सीन होता. जेव्हा महेश भट्ट यांनी या सीनबद्दल संजूबाबाला सांगितलं, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. पडद्यावर रोमँटिक आणि इंटिमेट सीन्स करताना अभिनय नाही तर अॅटिट्यूड महत्त्वाचा असतो, असं त्यांनी लेक पूजाला समजावून सांगितलं होतं. पूजाला ही गोष्ट समजली होती, परंतु संजय दत्तच्या मनात त्याविषयी प्रचंड संकोचलेपणा होता. कारण पूजा भट्टला तो तिच्या लहानपणापासून ओळखत होता.

याविषयी पूजाने सांगितलं, “संजय दत्तसोबत माझा किसिंग सीन होता आणि मी मनातल्या मनात कुठेतरी लपण्याचा विचार करत होती. परंतु संजयनेच मला किस करण्याची कल्पना नाकारली आणि थेट सांगितलं की मी तिच्यासोबत हा सीन करणार नाही, कारण मी तिला लहानाचं मोठं होताना पाहिलंय. माझ्या वडिलांनी हे ऐकलं आणि त्यांनी संजय दत्तवर ढोंगी म्हणून टीका केली. हा सरळसरळ ढोंगीपणा आहे, जर तू तिला किस करू शकत नाही, तर तुला कोणाच्याच मुलीला किस करण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले.”

पूजा भट्ट आणि महेश भट्ट या बापलेकीच्या जोडीने नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. 2020 मध्ये महेश भट्ट यांनी ‘सडक 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात पूजा आणि संजय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होते. तर पूजाची सावत्र बहीण आलिया भट्ट आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in