• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माहीने जय भानुशालीकडून मागितली इतक्या कोटींची पोटगी? अखेर सत्य आलं समोर

January 12, 2026 by admin Leave a Comment


टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. या दोघांना तीन मुलं असून त्यापैकी दोघांना त्यांनी दत्तक घेतलं होतं. घटस्फोटानंतरही तिन्ही मुलांचं संगोपन दोघं मिळून करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. यादरम्यान माहीने जयकडून कोट्यवधी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अखेर माहीने तिच्या युट्यूब चॅनलवर व्लॉग पोस्ट करत उत्तर दिलं आहे. माहीने जयकडे पाच कोटी रुपयांची पोटगी मागितल्याची चर्चा होती. परंतु या चर्चा खोट्या असल्याचं माहीने स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाली माही?

“अर्धवट माहितीमधून गोष्टी पसरवू नका. माहीने जयकडून पोटगी म्हणून 5 कोटी रुपये घेतले, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. फक्त लाइक्स आणि कमेंट्ससाठी आमच्या जुन्या मुलाखती काढून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. हे खूपच दु:खद आहे. मला मान्य आहे की आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्यामुळे लोकांना आमच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. पण हे सर्व करण्याची गरज नाही. घटस्फोटानंतर मी काहीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं तरी त्याचा संबंध जयशी जोडला जातोय. 14 वर्षांच्या संसारानंतर आम्ही घटस्फोट का घेतला, यामागचं कारण लोकांना माहीतसुद्धा नाही. तरीही त्यावर टिप्पण्या दिल्या जात आहेत,” अशा शब्दांत माहीने राग व्यक्त केला.

जयविषयी ती पुढे म्हणाली, “जय हा माणूस म्हणून खूप चांगला आहे, त्याचं मन खूप चांगलं आहे, फक्त आमच्यात काही गोष्टी ठीक चालल्या नाहीत, म्हणून आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचा तितकाच आदर करतो. अनेकजण म्हणतायत की, हा ड्रामा आहे, मस्करी आहे. त्यांना मी सांगू इच्छिते की, हा काही ड्रामा नाही. कोणालाच घटस्फोट घ्यायला आवडत नाही. देव न करो की तुमच्या घरात काही असं घडो. ज्याच्यासोबत घडतं, त्यालाच त्याचं दु:ख कळतं.”

माही आणि जय यांनी त्यांच्या नात्यासाठी बराच वेळ देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतरही सर्वकाही सुरळीत न झाल्याने त्यांनी अखेर शांततापूर्ण मार्गाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जयपासून विभक्त झाल्यानंतर माहीने तिच्या तारा, खुशी आणि राजवीर या तीन मुलांसाठी कोणताही पोटगीची किंवा देखभालीसाठीची रक्कम स्वीकारलेली नाही. घटस्फोटाचा निर्णय परस्पर संमतीने होता, म्हणून दोघांनी कोणत्याही वादविवादाशिवाय नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20i World Cup 2026 : वर्ल्ड कपआधी 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, पहिली मॅच केव्हा?
  • Shweta Tiwari : हातात देवी, उल्लेख धुरंधरचा, श्वेता तिवारीचं बेडरुममधलं फोटोशूट
  • Rahul Gandhi : 4 चिनी रणगाडे डोकलामच्या दिशेने..राहुल गांधींनी एवढ बोलताच लगेच राजनाथ उठून उभे राहिले आणि..संसदेत मोठा गोंधळ
  • क्रूझ कंट्रोल असलेली बाईक खरेदी करावी की नाही? फायदा होईल की नुकसान, जाणून घ्या
  • पान मसाला भरणार सरकारची तिजोरी, ‘या’ वर्षी किती हजार कोटींचे टार्गेट, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in