• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्यात थोडीतरी लाज शिल्लक..; मोदींवर सतत टीका करणारा प्रसिद्ध अभिनेता असं का म्हणाला?

February 2, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर ते बिनधास्तपणे आपली मतं मांडतात. केरळमधल्या तिरुवअनंतपुरम इथं पार पडलेल्या नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. मी आयुष्यात कधीच प्रोपगेंडा म्हणजेच प्रचारकी चित्रपट करणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. माझ्या विवेकबुद्धीनुसार मी चित्रपटाच्या कथा निवडतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ लेटर्स 2026’ (MBIFL) या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकाश राज हे भारतीय जनता पार्टीवर अनेकदा टीका करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका कऱणाऱ्यांना नावं ठेवली जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

प्रचारकी चित्रपटांबद्दल प्रकाश राज म्हणाले, “माझ्यात थोडीतरी लाज शिल्लक आहे. मला अशा पद्धतीने पैसे कमवायचे नाहीत. माझ्याकडे आता असे स्क्रीप्ट्स किंवा चित्रपट घेऊन येतसुद्धा नाहीत. कारण त्यांनाही माहीत आहे की मी असे प्रचारकी चित्रपट करत नाही. जर मला एखादा व्यावसायिक चित्रपट करायला असेल, तर तो मी कॉमेडी करेन. राजकारण, विचारसरणी आणि विचारप्रक्रिया यांबाबत मी खूप स्पष्ट आहे. कारण मला तसे मार्गदर्शक, शिक्षक आणि मित्र पदोपदी भेटले आहेत. माझ्यासह इतर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करतात, त्यांना नावं ठेवली जातात.”

प्रकाश राज हे बॉलिवूडसह तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहेत. सलमान खान आणि अजय देवगण यांच्या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. आजवरच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे कोणत्याही गॉडफादरशिवाय स्वत:ची छाप सोडण्यात यशस्वी ठरले आहेत. मेहनत आणि दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी स्टारडम मिळवला आहे. प्रकाश राजसुद्धा त्यापैकीच एक आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या प्रकाश राज यांनी अनेक स्टेज शोज केले होते आणि यातून ते महिन्याला फक्त 300 रुपये कमवायचे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव
  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in