• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझी प्रेयसी हो, अन्यथा नवऱ्याचा मृत्यू होईल;भीती दाखवून अशोक खरातचा भयानक कांड; तुम्हालाही येईल चीड!

March 19, 2026 by admin Leave a Comment


स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ, अंकशास्त्रज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवणारे 'कॅप्टन' अशोक खरात यांना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने खरात यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाने नाशिकबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरात यांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार २०१९ ते २०२५ या कालावधीत घडला. २०१९ मध्ये कॅनडा कॉर्नर येथील खरात यांच्या कार्यालयात तिची त्यांच्याशी ओळख झाली. खरात यांनी स्वतःला दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलेचा विश्वास संपादन केला. तिच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचे, समस्या सुटण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी विविध विधी करण्याचे सांगितले.

खरात यांनी महिलेला वारंवार कार्यालयात बोलावले. काही बदल दिसल्यास ते आपल्या 'शक्ती'चे फलित असल्याचे सांगितले. या काळात महिलेचा २०२१ मध्ये ठरलेला साखरपुडा मोडला. खरात यांनी सगळे सुरळीत होईल असे सांगून ५० हजार रुपये घेतले आणि 'पुष्कराज' खडा देऊन कल्याणाचे आश्वासन दिले. नोव्हेंबर २०२२ मध्ये खरात यांनी महिलेला कार्यालयात बोलावले. प्रसाद म्हणून पेढा आणि पाणी दिल्यानंतर महिलेला गुंगी आली. भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

नंतर महिलेचे लग्न ठरले आणि ते यशस्वीपणे पार पडले. खरात यांनी हे आपल्या 'कृपे'मुळे झाल्याचा दावा केला. लग्नानंतरही आशीर्वादासाठी कार्यालयात बोलावले आणि पुन्हा त्याच पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. लग्नानंतर खरात यांनी महिलेला धमकावले. “प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होईल, नवऱ्याचा मृत्यू होईल” अशा भीती दाखवल्या. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि भीतीमुळे महिलेला अखेर सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in