• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझी नक्कल पण मला बोलावलंसुद्धा नाही..; सूरज चव्हाणचं दुखावलं मन, नेमकं काय घडलं?

March 15, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच ‘झी चित्रगौरव पुरस्कार 2026’ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी , गौतमी देशपांडे, समीर चौघुले, ऋजुता देशमुख, पर्ण पेठे, पुष्कराज चिरपुटकर, रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, अमृता सुभाष, भारत जाधव, अमृता खानविलकर, ऋता दुर्गुळे, ललित प्रभाकर यांची उपस्थिती पहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यात भाऊ कदम, निलेश साबळे यांच्यासोबत काही कलाकारांनी मजेशीर स्किट सादर केलं. या स्किटदरम्यान ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणची नक्कल करण्यात आली. या नक्कलबाबत सूरजने नाराजी व्यक्त केली आहे.

सूरजने त्याच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो म्हणाला, “माझं मन प्रचंड दुखावलं आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात माझं कॅरेक्टर प्ले करण्यात आलं. याचा मला प्रचंड आनंद आहे. पण त्याचसोबत माझ्या मनात एक खंत आहे. ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. झी चित्र गौरवची टीम खूप मोठी आहे. त्यांनी मला बोलावलं असतं आणि कुठल्या तरी कोपऱ्यात एक जागा दिली असली तरी मला बरं वाटलं असतं. पण त्यांनी मला बोलावलं नाही, फोनसुद्धा केला नाही. यामुळे माझं मन दुखावलं गेलंय.”

“सूरज चव्हाण म्हणून माझं कॅरेक्टर त्यांनी उत्तम साकारला आहे. ते पाहून मी खुश आहे आणि प्रेक्षकसुद्धा खुश होतील. पण सोहळा सुरू असताना एका बाजूला मी कुठेतरी तिथे पाहिजे होतो, एवढीच माझी अपेक्षा होती. मी माझ्या चाहत्यांना देव मानतो. तुम्हाला आणि महाराष्ट्राला मी एकच प्रश्न विचारतो की मला त्या सोहळ्याला बोलावलं पाहिजे होतं की नाही”, असा सवाल सूरजने चाहत्यांना केला आहे. सूरजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘दादा तू ब्रँड आहेस, मग तुझी कॉपी होणारच ना’, असं एकाने लिहिलंय. ‘तुझ्यासोबत आम्ही चाहते आहोत, काळजी नसावी’, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in