• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मागून आला, डोक्यावर रोखली बंदूक अन्.. भर लग्नसमारंभात माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार, कोण आहे हल्लेखोर ?

March 12, 2026 by admin Leave a Comment


जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी संध्याकाळी उशिरा जम्मूमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ते नियोजित वेळेवर पोहोचले होते. एवढंच नव्हे तर जम्मू काश्मीर सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते देखील या समारंभीत उपस्थित होते. मात्र त्या समारंभात फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. . फारुख अब्दुल्ला हे त्यांच्या सुरक्षारक्षकांसह समारंभातून बाहेर पडत होते, मात्र तेव्हाच अचानक हा हल्ला झाला. सुदैवाने त्यांना गोळी लागली नसल्याने ते जखमी झाले नाहीत, पण या हल्ल्यामुळे लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली, लोक घाबरून इकडेतिकडे सैरावैरा पळू लागली. कमल सिंग जामवाल असे हल्लेखोराचे नाव असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे अशी माहिती मिळत आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेले, फारुख अब्दुल्ला लग्नासाठी आले होते. तिथून ते परत निघाल्यानंतर हल्लेखोर कमल सिंग जामवाल हा मागून आला आणि त्याने अब्दुल्ला यांच्या डोक्यावर बंदूक रोखली आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अब्दुल्ला यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत, तातडीने कारवाई करत आरोपीला मागे खेचलं आणि त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली. काही लोकांनी कमल सिंग याला पकडल्यानंतर त्यांच्यावरही हल्ला केला.

कोण आहे हल्लेखोर ?

मिळालेल्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला यांच्यावर ज्याने हल्ला केला तो इसम, कमल सिंग जामवाल हा अंदाजे 63 वर्षांचा आहे. माजी मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला लगेचच अटक केली. कमल सिंग जामवाल हाँ पुरानी मंडीचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पुरानी मंडीमध्ये दुकान चालवत असल्याचे त्याने पोलिस चौकशीदरम्यान स्वतः सांगितलं.

20 वर्षांपासून करायचा होता हल्ला

पोलिसांनी हल्लेखोर कमल याच्याकडून एक परवानाधारक पिस्तूल जप्त केलं. त्याने याच पिस्तूलचा वापर फारुख अब्दुल्लांवर हल्ला करण्यासाठी केला होता. त्याच्या चौकशीत बरीच धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तो गेल्या 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांच्या हत्येचा कट रचत होता, असं त्याने सांगितलं. मात्र अखेर त्याला काल, बुधवारी संध्याकाळीच ही संधी मिळाली. आपल्या चुलत भावाच्या मुलाच्या लग्नाला फारुख अब्दुल्ला हे उपस्थित राहणार आहेत असं त्याला लग्नाच्या काही तासांपूर्वीच कळलं. म्हणूनच त्याने हल्ल्याची कट आखला.

हल्ल्याच्या या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून कमल याने हल्ला का केला य़ाचं नेमकं कारण शोधलं जात आहे. सुरक्षा संस्था आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून कसून तपास सुरू केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
  • SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?
  • हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video
  • बाईक, सेल्फीस्टिक आणि मोबाईल लोकेशन… सोलो ट्रेकरचा मृत्यू, 300 फूट दरीत कोसळून अंत; त्या डोंगरात नेमकं काय घडलं?
  • तर भारताला सर्वात मोठा फटका, इराणकडून भयंकर संकटाची चाहूल; युद्ध न थांबवल्यास…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in