• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान समालोचन का करत नाही? स्वत:च सांगितलं कारण…

February 4, 2026 by admin Leave a Comment

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएल 2026 स्पर्धेसाठी तयारी करत आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. पण वर्षभर महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असतो. भारतीय संघाचे सामने असले तरी धोनी समालोचन करताना दिसत नाही. तसं पाहिलं तर दिग्गज क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर समालोचन करतात. पण महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत तसं नाही. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर समालोचनापासून दूरच राहिला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याचे विचार ऐकण्याची संधी काही मिळत नाही. त्यामुळे धोनी समालोचनापासून लांब का राहात असावा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आता महेंद्रसिंह धोनी याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. धोनीने सांगितलं की, आकडेवारी लक्षात ठेवू शकत नाही आणि त्यामुळे समालोचन करत नाही.

महेंद्रसिंह धोनीने जतीन सप्रूला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “समालोचन करणे हे खूप कठीण काम आहे. मला वाटते की खेळाचे वृत्तांकन करणे आणि खेळाडूंवर टीका करणे यात खूप पातळ रेषा असते. कधीकधी तुम्हाला कळतही नाही आणि ती रेषा ओलांडली जाते.” धोनी पुढे म्हणाला की, समालोचन करणं हे कौशल्यपूर्ण काम आहे. तुम्हाला योग्य दृष्टीकोन मांडता येणं गरजेचं आहे. जर काही चूकत असेल तर ते सांगणही महत्त्वाचं आहे. पण यामुळे कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. जर एखादा संघ पराभूत होत असेल तर त्यामागे कारणं असतात. पराभूत झाला म्हणून बोटं न दाखवता खरं काय आहे ते सांगणं म्हणजेच समोलचन असतं.

🚨MS Dhoni reveals why he will never become commentator🚨

MS Dhoni said:🗣

“Commentary is very difficult. I feel there is a very fine line between describing the game and in that process getting into a zone where you start criticising individuals who are playing the game. It’s… pic.twitter.com/v1FeTTEMB7

— Shanu (@Shanu_3010) February 4, 2026

महेंद्रसिंह धोनीने सांगितलं की, ‘मी स्वत:ला एक चांगला श्रोता मानतो. मी फक्त अशा लोकांशीच मोकळेपणाने बोलतो ज्यांच्याशी मी सहजतेने बोलतो. मला सामान्यतः बोलण्यापेक्षा ऐकणे जास्त आवडते. जर मला एखाद्या विषयाचे पूर्ण ज्ञान नसेल तर मी त्यावर जास्त बोलत नाही कारण मला वाटते की ऐकणे अधिक उपयुक्त आहे.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरातील तुळस अचानक वाळली तर ते शुभ की अशुभ? काय आहेत समज, गैरसमज?
  • WPL 2026 Final, RCB vs DC : दिल्ली-बंगळुरु फायनलसाठी सज्ज, महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
  • WPL 2026 Final : कॅप्टन जेमिमाह इतिहास बदलण्यासाठी सज्ज, दिल्ली चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होणार?
  • यंदाचे पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येला, भारतात दिसणार की नाही? वाचा…
  • Chanakya Niti : या ठिकाणी आयुष्यात कधीच जाऊ नका, उद्ध्वस्त व्हाल, चाणक्य काय म्हणतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in