• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर

March 24, 2026 by admin Leave a Comment


अध्यात्म आणि भक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांनी नाशिक जिल्हा हादरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची मुदत आज संपत आहे. त्यामुळे नाशिक पोलीस त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तपासादरम्यान अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात एकूण ६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातवर पूर्वी फक्त एकच गुन्हा दाखल होता. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी अशोक खरातवर आणखी पाच गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र पोलीस तपासात आणि पीडितांनी धिर धरून पुढे आल्यानंतर आणखी तीन तक्रारींची भर पडली आहे. यात प्रामुख्याने लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि विनयभंग यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खरातने अनेक महिलांना दैवी शक्ती दाखवण्याचे आमिष दाखवून त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुंतागुंत लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. एसआयटी सध्या खरातच्या मालमत्तेची, त्याच्या बँक व्यवहारांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची कसून चौकशी करत आहे. खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर अनेकांना कामाचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचेही निष्पन्न होत आहे.

पीडितांसाठी हेल्पलाइन; ओळखीची गुप्तता राखणार

मात्र अनेक पीडित महिला सामाजिक भीतीपोटी तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून नाशिक पोलिसांनी दोन विशेष हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, जे कोणी तक्रार देतील त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. त्यामुळे पीडितांनी 9593270224 आणि 7775816389 या दोन नंबरवर तक्रार करावी.

आजची न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची

अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला दुपारी नाशिक न्यायालयात हजर केले जाईल. गुन्ह्यांची वाढती संख्या आणि तपासाचे अपूर्ण काम पाहता, पोलीस पुन्हा एकदा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची दाट शक्यता आहे. या रॅकेटमध्ये खरातला आणखी कोणी मदत केली होती का, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
  • Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…
  • टोयोटाचा धमाका! अवघ्या 40 महिन्यांत विकल्या गेल्या 2 लाख गाड्या, ‘या’ 7 सीटर कारने उडवली झोप, किंमत फक्त..
  • छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…
  • बोल्ड सीन असणारे 5 चित्रपट, ज्यामध्ये अभिनेत्रींनी पार केल्या सर्व मर्यादा, आता OTT वर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in