• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातल्या ‘सालबर्डी’ गावातली रहस्यमयी कथा; अंगावर काटा आणणारा थरारपट

January 23, 2026 by admin Leave a Comment


इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट नुकताच जाहीर झाला आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा पोस्टर पाहूनच चित्रपटाची गूढ कथा अधोरेखित होते.

नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ.गजानन जाधव, राम जाधव यांनी केली आहे. तर रमेश साहेबराव चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘सालबर्डी’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून या चित्रपटाच्या विषयाची भीषणता अधोरेखित होत आहे. या गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं काळकभिन्न वास्तव हा या चित्रपटाचा गाभा आहे. भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पाहणं अतिशय थरारक असणार आहे. भीती, थरार, विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात मराठीतल्या उत्तम कलाकारांची मांदियाळी आहे. परंतु हे कलाकार नेमके कोण आहेत, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by सालबर्डी मराठी चित्रपट (@salbardifilm)

‘सालबर्डी’ चित्रपटाचं छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचं आहे. तर पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचं आहेत. गुरु ठाकूर, मुकुंद भालेराव यांनी लिहिलेल्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचं संगीत लाभलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटाला लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, आशीष पाटील यांनी केलं आहे. कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील आहेत. वेशभूषा प्रणिता चिंदगे तर रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांची आहे. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचं आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडतंय?
  • CCTV कॅमेऱ्याची दिशा बदलली, दरवाजा, खिडकीची कडी तुटली..; निर्माता साजिद नाडियादवालाच्या बंगल्यात अज्ञातांचा प्रवेश अन्..
  • Budget 2026 सुरु होताच शेअर बाजारात दिवाळी, ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ… निफ्टी आणि सेन्सेक्सचे ‘अच्छे दिन’
  • Budget 2026 : आता शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना काय?
  • Heat Red Alert : जगात भयानक उष्णता वाढणार, ऑक्सफोर्डने दिला इशारा, भारतात काय होणार ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in