• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्राच्या माजी मुंख्यमंत्र्यांची नात कोणाला करतेय डेट? खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण

March 14, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता वेदांग रैना यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शर्वरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. रिपोर्टनुसार, शर्वरी आणि वेदांग दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित ‘वापस आऊंगा’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान एकमेकांच्या जवळ आली… सध्या सर्वत्र वेदांग आणि शर्वरी यांच्या नात्याने जोर धरला आहे. पण दोघांनी देखील नात्याबद्दल कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही..

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शर्वरी वाघ आणि वेदांग रैना आता फक्त चांगले मित्र राहिलेले नाहीत तर आता डेटिंग करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. असं देखील म्हणलं जात आहे की, वेदांग आणि शर्वरी यांची भेट सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान झाली होती. अखेर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आहे.

रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, वेदांग आणि शर्वरी त्यांच्या नात्यात अत्यंत गंभीर आहेत आणि दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला प्रचंड आवडतं… पण दोघांनी देखील सर्वांपासून त्यांचं नातं गुपित ठेवलं आहे. शर्वरी आणि वेदांग यांना त्यांचं नातं खासगी ठेवायचं आहे.

दरम्यान 13 मार्च 2026 रोजी ‘वापल आऊंगा’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी अधिक जोर धरला… सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहे. सिनेमाची कथा 1947 फाळणीच्या पार्श्वभूमीभोवती फिरताना दिसत आहे. सिनेमात शर्वरी, वेदांग यांच्यासोबत दिलजीत दोसांझ आणि नसीरुद्दीन शाह यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सिनेमाच्या टीझरमध्ये शर्वरी आणि वेदांग यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. आता खऱ्या आयुष्यात देखील दोघांच्या खासगी आयुष्यातील चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शर्वरी हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, वेदांग याच्याआधी अभिनेत्रीचं नाव अभिनेता विकी कौशल याचा भाऊ सनी कौशल याच्यासोबत जोडलं जात होतं… अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

तर वेदांग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, वेदांग आणि अभिनेत्री खुशी कपूर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. पण 2026 च्या सुरुवातील दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला.. आता शर्वरी आणि वेदांग यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील यावर कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in