• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महात्मा गांधी यांच्यापूर्वी भारतीय नोटांवर कोणाचा फोटो होता? तुम्हालाही माहीत नसणार उत्तर

February 7, 2026 by admin Leave a Comment


भारताच्या चलनावर आता आपल्याला महात्मा गांधी यांचा फोटो पाहायला मिळतो, महात्मा गांधी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त 1969 साली पहिल्यांदा त्यांचा फोटो नोटेवर छापण्यात आला होता, त्यानंतर 1987 साली नव्याने छापण्यात आलेल्या 500 रुपयांच्या नोटेवर देखील महात्मा गांधी यांचा फोटो पहायला मिळाला. त्यानंतर 1996 साली भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) नव्या चलनी नोटा मार्केटमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. परंतु तेव्हा असा प्रश्न होता की, नोटांवर नेमका कोणाचा फोटो छापायचा? तेव्हा नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला. नोटांवर महात्मा गांधी यांचाच फोटो छापण्याचा निर्णय का घेण्यात आला तर त्याचं कारण असं होतं की, महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठे नेते होते, एक मोठा चेहरा होता. तसेच जगभरात महात्मा गांधी यांना सत्य आणि अहिंसेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला महात्मा गांधी यांचा फोटो 500 रुपये आणि 10 रुपयांच्या नोटेवर छापण्यात आला, आणि त्यानंतर हळुहळु सर्व नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात आला. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की ज्यावेळी नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो नव्हता? तेव्हा नोटांवर कोणाचा फोटो होतो? आज आपण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भरतावर इंग्रजांचं राज्य होतं. तेव्हा भारतामध्ये ज्या नोटा वापरात होत्या त्यावर किंग जॉर्ज पंचम यांचा फोटो होतो. या नोटा ब्रिटिश सरकारने जारी केल्या होत्या, त्यानंतर काही काळ किंग जॉर्ज षष्ठम यांचा देखील फोटो हा नोटांवर पहायला मिळाला. या नोटा इंग्लंड मधून मागवण्यात येत होत्या. या नोटा टिकाऊ आणि मजबूत कागदावर छापण्यात येत होत्या, तसेच त्या नोटांचं डिझाइन ही खूपच रंगीबेरंगी होतं.

जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारत सरकारने नोटांवर असलेला किंग जॉर्ज षष्ठम यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय चलनावर अशोक स्तंभाच्या चिन्हासोबत शेती, विकास आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेले फोटो छापण्यात येत होते. 1969 साली पहिल्यांदा महात्मा गांधी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त त्यांचा फोटो नोटेवर छापण्यात आला, त्यानंतर 1996 पासून सर्व प्रकारच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात येऊ लागला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उत्तम क्वॉलिटीचा कॅमेरा आणि बजेट कमी, विवोचा ‘हा’ स्मार्टफोन या तारखेला लाँच होणार
  • ENG vs NEP Live Streaming : इंग्लंड रोहितच्या टीम विरुद्ध भिडणार, प्लेइंग ईलेव्हन जाहीर, सामना किती वाजता?
  • NZ vs AFG Live Streaming : न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा हिशोब चुकता करण्याची संधी, जिंकणार?
  • इंडस्ट्रीमधील ‘बॅड बॉय’ची मुलगी दिसतेय प्रचंड बोल्ड आणि हॉट, गाजवतेय बॉलिवूड, फोटो पाहून…
  • 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांनो तुमच्या अपेक्षा तुम्हीच कळवा, आयोगाने उचलले मोठे पाऊल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in