• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महागड्या ड्रेसवरील रंगाचा डाग निघता निघत नाही, मग आता टेन्शन सोडा; फक्त 2 तासात दिसतील नव्यासारखे

March 4, 2026 by admin Leave a Comment


सध्या देशभरात धुळवडीची मज्जा मस्ती पाहायला मिळत आहे. अनेक लोक सध्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. होळी आणि रंगपंचमीचा सण म्हटला की रंगांची उधळण आलीच, पण कधी कधी हीच रंगाची उधळ आपल्या चिंतेचा भाग होऊन जाते. काही वेळा आपले आवडते कपडे पूर्णपणे रंगाने माखतात. काही वेळा तर महागडे टी-शर्ट किंवा कुर्ते रंगांच्या डागांमुळे फेकून द्यावे लागतात. तुम्हालाही जर याच गोष्टींची भीती सतावत असेल तर अजिबात घाबरु नका. कारण तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील काही साध्या गोष्टी वापरून हे रंगाचे डाग सहज घालवू शकता.

1. लिंबू आणि मिठाचा वापर

लिंबू हे नैसर्गिक आम्लयुक्त असल्याने डाग काढण्यासाठी उत्तम मानले जाते. तुमच्या कपड्यार डाग पडलेल्या भागावर अर्धे लिंबू कापून त्यावर थोडे मीठ टाका आणि हलक्या हाताने घासा. १५ मिनिटे तसेच ठेवून द्या. लिंबामुळे रंगातील रासायनिक घटक कमी होतात. ज्यामुळे डाग लवकर निघतात.

2. पांढरे व्हिनेगर आणि लिक्विड सोप

जर तुमच्या कपड्यावर पक्का रंग लागला असेल, तर व्हिनेगर हा रामबाण उपाय आहे. एका बादलीत थंड पाणी घेऊन त्यात अर्धा कप पांढरे व्हिनेगर आणि दोन चमचे लिक्विड डिटर्जंट टाका. कपडा किमान २ ते ३ तास त्यात भिजत ठेवा. व्हिनेगरमुळे कापड्यांवर लागलेले रंग लगेचच निघतात.

3. बेकिंग सोडा आणि पाणी

पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाच्या कपड्यांसाठी बेकिंग सोडा अत्यंत प्रभावी ठरतो. बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर जुन्या टूथब्रशने घासून कोमट पाण्याऐवजी थंड पाण्याने धुवून टाका.

4. नॉन-जेल टूथपेस्ट

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण साधी पांढरी टूथपेस्ट रंगाचे डाग काढण्यास मदत करते. तुमच्या ज्या कपड्यावर रंगाचा डाग पडला आहे, त्या ठिकाणी थोडी टूथपेस्ट लावा. यानंतर ती सुकेपर्यंत थांबा. त्यानंतर डिटर्जंट वापरून कपडा धुवा. यामुळे डाग पूर्णपणे जाण्यास मदत होते.

5. अल्कोहोल किंवा सॅनिटायझर

आजकाल प्रत्येकाकडे सॅनिटायझर असतेच. सॅनिटायझरमधील अल्कोहोल रंगाला विरघळवण्याचे काम करते. तुमच्या कपड्यावर लागलेल्या डागावर थोडे सॅनिटायझर टाका आणि कापसाने तो भाग टॅप करा. रंग कापसाला चिकटले आणि तुमचा कपड्यावरील रंग आपोआप निघून जाईल.

या पाच टिप्स कायम लक्षात ठेवा

  • रंगाचे डाग काढण्यासाठी गरम पाण्याचा वापर करु नका. गरम पाण्यामुळे रंग कापडाच्या धाग्यांमध्ये कायमचा स्थिरावतो. नेहमी गार पाण्याचाच वापर करा.
  • कपड्यावरी रंग सुकण्यापूर्वीच कपडे धुवा. त्यामुळे डाग ७० ते ८० टक्के सहज निघतात.
  • रंगीत कपड्यांवर ब्लिच वापरल्याने त्यांचा मूळ रंग उडू शकतो. त्याऐवजी ऑक्सिजन ब्लिच वापरा.
  • रंग काढलेले कपडे थेट कडक उन्हात वाळत घालू नका, सावलीत वाळवा जेणेकरून कापडाचा रंग फिका पडणार नाही.
  • जर कपड्यावर कोरडा गुलाल असेल, तर आधी तो झटकून टाका. थेट पाणी टाकल्यास गुलाल पसरून डाग मोठा होऊ शकतो.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in