• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला वाटलं कपल असतील… रात्री 2 वाजताचं ते दृश्य… ट्रिपल सुसाईड केसमध्ये प्रत्यक्षदर्शीने सांगितली ती गोष्ट..

February 4, 2026 by admin Leave a Comment


रात्री बरोबर 2 वाजले होते… समोरच्या फ्लॅटत्या बालकनीतील दिवे सुरु होते… माझी नजर अचानक तेथे गेली… कारण त्या क्षणी रेलिंगवर कोणीतरी बसलेलं दिसणं सामान्य नव्हतं. मला वाटलं की ते एक कपल असेल. एक माणूस मागे उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसरा त्याला मागे खेचत होता, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता… संबंधित धक्कादायक घटना सांगणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचं नाव अरुण कुमार असं आहे. ज्याने तीन अल्पवयीन मुलींना एकत्र स्वतःचं प्राण संपवताना पाहिलं आहे. अरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक मुलगी रेलिंगच्या खाली उतरली… त्यानंतर पुन्हा रेलिंगवर बसली.. तेव्हा दुसरी मुलगी आणि तिला मिठी मारली… त्यानंतर तिसऱ्या मुलीने दोघींना स्वतःकडे ओढून घेतलं. पण तेव्हाच तीन मुली खाली कोसळल्या.’

अरुण पुढे म्हणतात, ‘मी लगेच धावलो. प्रथम, मी रुग्णवाहिका बोलावली आणि त्यानंतर पोलिसांना. मी सुरक्षारक्षकांनाही बोलावलं. त्यांनी सांगितलं की त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती की पडलेल्या तिघी अल्पवयीन बहिणी आहेत. ते संपूर्ण दृश्य पती, पत्नी आणि मुलासारखं वाटलं. अरुण नावाच्या एका व्यावसायिकाने सांगितलं की, त्याने जे पाहिले ते त्याने पोलिसांना सांगितलं.’

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा देखील दृश्य क्राईम सीनपेक्षा कमी नव्हती… खोलीत पाय ठेवताच जमिनीवर सर्वत्र कुटुंबियांचे फोटो पसरलेले होते. असं वाटत होतं, कोणीतरी फोटो फेकले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी सुसाईड नोट भेटली आहे. त्यावर लिहिलं होतं. I AM REALLY VERY ALONE, MY LIFE IS VERY VERY ALONE , I AM VERY VERY ALONE I AM VERY VERY ALONE… (मी खूप एकटी आहे. माझे आयुष्य खूप एकटं आहे…. मी खूप एकटी आहे….मी खूप एकटी आहे….)

चार भींतीत काय होत होतं… दोन लग्न पाच मुलं…

प्रकरणात कौटुंबिक बाजू देखील थक्क करणारी आहे. मुलीच्या वडिलांनी दोन लग्न केली आहे. पहिल्या लग्नानंतर मुल होत नसल्यामुळे, व्यक्तीने पहिल्या पत्नीच्या बहिणीसोबतच दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीने तीन मुलांना जन्म दिला. तर पहिल्या पत्नीला देखील दोन मुलं झाली. अशाप्रकारे, कुटुंबात दोन बायका, पाच मुले होते. आत्महत्या केलेल्या तीन बहिणींपैकी दोन दुसऱ्या पत्नीच्या मुली होत्या, तर एक पहिल्या पत्नीची मुलगी होती. बाहेरून कुटुंबात सर्वकाही सुरळीत सुरु आहे… असं दिसत होतं. पर चार भींतीत काय सुरु आहे कोणालाच माहिती नव्हतं.

ऑनलाइन गेमच्या पडल्या बळी

ऑनलाइन गेमिंग ऍप्सच्या बळी ठरलेल्या आणि सतत गेमिंग करत असलेल्या या तिन्ही बहिणींबद्दल माहिती समोर येत आहे. मुलींच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना नेहमीच गेम खेळण्यापासून परावृत्त केलं होतं. असं म्हटलं जात आहे की, ते तिघेही ऑनलाइन टास्क-आधारित गेम कोरियन लव्हर खेळत असत. मात्र, त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलीस करत आहेत तपास

घटनेची माहिती मिळताच, एसीपींच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. एसीपी स्वतः घटनेचा तपास करत आहेत. आर्थिक कारणांमुळे कोरोना विषाणूच्या साथीपासून तिन्ही मुली शाळेत जाऊ शकल्या नव्हत्या. त्याच्या खोलीत कोरियन ऑनलाइन मोबाईल गेमचे नमुने असलेले फोटो विखुरलेले आढळले. गेमची अंतिम लेव्हल पूर्ण केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं. तपास करण्यासाठी पोलिसांनी सुसाईड नोट देखील जप्त केली आहे. संबंधित घटना गाझियाबाद येथे घडली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in