• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला तिच्यासोबत नाही राहायचंय..; सुपरस्टारला हवाय घटस्फोट, पत्नीकडून 10 कोटी, घराची मागणी

March 26, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता पवन सिंह गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी ज्योती सिंहला घटस्फोट देण्यासाठी त्याने कोर्टात अर्ज दाखल केला असून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो बुधवारी (25 मार्च, 2025) आरा सिव्हिल कोर्टात पोहोचला होता. दुपारी 2 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पवन सिंह कोर्टात हजर राहिला, परंतु या सुनावणीला त्याची पत्नी ज्योती सिंह उपस्थित नव्हती. जवळपास 35 ते 40 मिनिटांनंतर तो कोर्टातून जेव्हा बाहेर पडला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा होती. मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टात पवन सिंहची पत्नी ज्योती सिंहलाही हजर राहायचं होतं. परंतु काही कारणास्तव ती सुनावणीला पोहोचू शकली नव्हती. कोर्टाने या दोघांना फेरविचार करण्यासाठी बोलावलं होतं, अशी माहिती पवन सिंहचे वकील सुमन कुमार यांनी माध्यमांना दिली.

कोर्टाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्योतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तिच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. तेव्हा पवन सिंहने कोर्टात न्यायाधीशांसमोर स्पष्ट सांगितलं की मला ज्योतीसोबत राहायचं नाही. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सिंहने असंही कोर्टात मान्य केलं की, जो काही वन-टाइम सेटलमेंट असेल, ते देण्यासाठी मी तयार आहे. याप्रकरणी ज्योती सिंहचे वकील विष्णुधर पांडे यांनी सांगितलं की, जर ज्योती सिंहसोबत पवन सिंहला राहायचं नसेल तर त्याने 10 कोटी रुपये, एक घर आणि सुनावणी पूर्ण होईपर्यंतचा खर्च तिला द्यावा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Singh (@singhpawan999)

याआधी 11 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सुनावणीला ज्योती सिंह उपस्थित होती. यावेळी तिने साडी नेसली होती आणि तिच्या भांगेत सिंदूरसुद्धा पहायला मिळाला होता. त्यावेळी पवन सिंहने मात्र आजारपणाचं कारण देत कोर्टात हजर राहणं टाळलं होतं. नंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाने त्याच्याशी संपर्क साधला होता.

पवन सिंहची पहिली पत्नी नीलम सिंहने 2015 मध्ये आत्महत्ये केली होती. त्यानंतर भोजपुरीचा पॉवरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या पवन सिंहचं नाव अभिनेत्री अक्षरा सिंहशी जोडलं जात होतं. नंतर 2018 मध्ये त्याने ज्योती सिंहशी लग्न केलं. ज्योती सिंहने त्याच्याविरोधात मानसिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. पवनने मला गर्भपात करण्यास भाग पाडलं आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं, असे गंभीर आरोप ज्योतीने केले होते.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in