• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठे पुन्हा आक्रमक होणार… मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा इशारा, सरकारकडे नेमकी मागणी काय?

April 12, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची घोषणा करताना सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीत, त्यामुळे आता मराठे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांकडून आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘सरकारने शब्द दिला होता की, सर्व गुन्हे मागे घेतले जातील. जो पर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही. सरकारने तसा शब्द दिलेला आहे. नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू. दाखल गुन्ह्यांपैकी 60- 62 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. त्याबाबत सरकारने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला हवे. 80 गुन्हे असे आहेत त्याबाबत विभागीय समितीने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला लावावेत. सरकार आणि फडणवीस जरी त्यांनी दिलेल्या शब्दापासून बदलले असले तरी त्यांना मी बदलू देणार नाही. कसे गुन्हे मागे घेत नाही मी बघतो, मी खंबीर आहे.’

मराठा उपसमितीवर टीका

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णन विखे पाटील यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, ‘जी उपसमिती मराठ्यांची स्थापन झालीये त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, त्यांनी दिखावा करण्यासाठी थातुर मातूर बैठका घेऊ नयेत. मराठा समाजाला उप समितीच्या अध्यक्षकडून अपमानास्पद वागणूक चालू आहे, ती थांबली पाहिजे. त्यांना समज पाहिजे मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्यासाठी उपसमिती नाही. त्याचा अध्यक्ष त्यासाठी नाही, तुमचा माज जिरवण्यासाठी उपसमिती नाही. तुमची मस्ती मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची झुजांयला लावायच यासाठी उप समिती नसते. ईसीबीसीच्या विद्यार्थ्यांचं काय? सारथीच्या विद्यार्थ्यांचं काय? आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांचं काय? यासाठी उपसमिती असते.

समितीला मराठ्याचे प्रश्न सोडवाचे नाहीत

आम्हला वाटलं होतं 100% मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, मात्र उपसमितीच्या अध्यक्षांनी उलट उफनायला सुरवात केलीय. मराठे मराठ्यांच्या अंगावर घालवण्याची चळवळ त्यांनी सुरू केली, त्यांना मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. याने ते कधीच मोठे होणार नाहीत. त्यांच्या डोक्यात हवा शिरली असेल की, मराठे मराठ्यांच्या अंगावर घालले की मराठ्यांचे प्रश्न दाबले जातील. तुम्ही मराठ्या मराठ्यांमध्ये कलगी तुरा लावून जिंकणार नाहीत हे लक्षात ठेवा. तुम्ही खुप चिखलात चालला आहात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: शुबमन गिलकडून नव्या विक्रमाची नोंद, 4000 धावा करत विराटच्या पुढे निघून गेला
  • लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला… धक्कादायक माहिती समोर
  • Asha Bhosle : आशाताईंचे ते शेवटचे गाणे..जे आता कधीच पूर्ण होणार नाही..
  • IPL 2026, GT vs LSG: गुजरात टायटन्सकडून पराभव होताच ऋषभ पंतने असं फोडलं खापर, म्हणाला…
  • IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, मॅचविनर बॉलरचा पत्ता कट, Playing 11 मध्ये कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in