• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मराठी बाणा’चे निर्माते अशोक हांडे यांना बेदम मारहाण; माटुंग्याच्या कार्यालयात घुसून थेट बॅटने मारलं, नेमकं काय घडलं?

March 6, 2026 by admin Leave a Comment


‘मराठी बाणा’ या कार्यक्रमातून जगभरात मराठी संस्कृती पोहोचवण्याचं काम करणारे अशोक हांडे यांना पार्किंगच्या मुद्द्यावरून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. अशोक हांडे यांना एका 53 वर्षीय व्यक्तीने क्रिकेटच्या बॅटने मारल्याचं कळतंय. याप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीचं नाव प्रथमेश पांडुरंग अनफोडे ऊर्फ बंटी असं आहे. पार्किंगच्या क्षुल्लक वादातून ही मारहाण केल्याचं समजतंय. अशोक हांडे हे लोककलेचे अभ्यासक असून ‘मराठी बाणा’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमाचे ते सर्वेसर्वा आहेत.

कार्यालयाची तोडफोड अन् अशोक हांडेंना मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 मार्च रोजी घडली होती. माध्यमांसमोर ही घटना आता उघडकीस आली आहे. अशोक हांडे हे मुंबईतील माटुंगा पश्चिम इथल्या युनायडेट हाऊसच्या तळ मजल्यावरील कार्यालयात बसले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा आरोपी थेट बॅट घेऊन त्यांच्या कार्यालयात आला. त्याने बॅटने आधी कार्यालयाच्या काचांची तोडफोड केली. त्यानंतर त्याने अशोक हांडेंकडें पार्किंगचे पैसे मागायला सुरुवात केली. परंतु पार्किंगच्या जागेशी त्या व्यक्तीचा काहीच संबंध नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आरोपीने शिवीगाळ करत बॅटने अशोक हांडेंना मारहाण करायाला सुरुवात केली. कार्यालयातील इतर काही कर्मचाऱ्यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अधिकच आक्रमक होत असल्याचं पाहून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनाही वापरले अपशब्द

1 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हासुद्धा आरोपीने त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर आरोपीने पोलिसांसमोरही काही अपशब्द वापरले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक हांडे यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशोक हांडे हे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि लोककलेचे अभ्यासक आहेत. मराठी बाणा या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग
  • दिसायला सेम पण पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या जास्त जड का ? 90 टक्के लोकांना हे माहीतच नसतं
  • Vaibhav Sooryavanshi : वैभवचा सिनियर टीम इंडियात समावेश कधी? अनिल कुंबळेंचे रोखठोक उत्तर, एकवेळ अशी येते जेव्हा..
  • 747 कोटी बजेट अन् चित्रपट ठरला फ्लॉप, OTT वर येताच बनला धुरंधर, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, कथा ठरतेय सुपरहिट
  • 10.79 लाखांच्या ‘या’ SUV चा जलवा, स्कॉर्पियो-थारलाही टाकलं मागे, 10 वर्षांपासून भारतीयांच्या मनावर राज्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in