• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठमोळं कुटुंब पाकिस्तानात जातं तेव्हा..; भरत दाभोळकर यांचा ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ मधून धमाका!

March 26, 2026 by admin Leave a Comment


अनेक दशकं इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळंवेगळं नाटक घेऊन येत आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे नाटक लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत भरत दाभोळकर यांनी पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांसारख्या दिग्गज मराठी लेखकांची नाटकं इंग्रजीत नेली आणि ती गाजवली. अनेकदा हलके-फुलके विषय घेऊन स्वतः दाभोळकरांनीही आपल्या लेखन-दिग्दर्शनाने हिंदी, इंग्रजी, गुजराती प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यावेळीही ते स्वतःचं मूळ इंग्रजी नाटक मराठीत घेऊन येत आहेत. यापूर्वी इंग्रजीत हे नाटक विजू खोटे, किशोर प्रधान, विहंग नायक, वृषाली गोखले, अतुल परचुरे, अतुल काळे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अजरामर केलं होतं. आता हेच नाटक मराठीत आणण्याचं धाडस निर्माते आकाश भडसावळे यांनी केलं आहे.

आता ‘मराठमोळं’ कुटुंब पाकिस्तानात!

मूळ इंग्रजी नाटकात एक गुजराती कुटुंब दाखवण्यात आलं होतं, मात्र मराठी प्रेक्षकांची नस ओळखून लेखनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नाटकाचा मूळ गाभा तोच ठेवून संपूर्ण नाटक आता ‘मराठमोळ्या’ पद्धतीने सादर होणार आहे. भरत दाभोळकर म्हणतात, “मराठीत आतापर्यंत विनोद, सस्पेन्स आणि ऐतिहासिक नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. इंटरनेटमुळे आजच्या पिढीला जगभरातील गोष्टी ठाऊक आहेत. अशातच एखादं मराठमोळं कुटुंब जेव्हा पाकिस्तानात जातं, तेव्हा तिथे उडणारी त्यांची धांदल आणि तो ‘ॲडव्हेंचरस’ प्रवास पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

भन्नाट टीम आणि भन्नाट अनुभव

या नाटकाच्या निमित्ताने भरत दाभोळकर आणि अभिनेते-निर्माते आकाश भडसावळे ही जोडी एकत्र आली आहे. आकाशबद्दल बोलताना दाभोळकर सांगतात की, “आकाश हा एक अत्यंत ऑर्गनाइज आणि प्रो-अॅक्टिव्ह प्रोड्युसर आहे, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे.” या नाटकात भरत दाभोळकर यांच्यासोबत त्यांचे इंग्लिश-हिन्दी नाटकातील अनेक वर्षांचे जुने सहकारी आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आझाद ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर कमाल करताना दिसेल.

ओटीटीला कंटाळलेला प्रेक्षक आता नाटकाकडे!

सध्या मराठी नाटकांना मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. भरत दाभोळकर यांच्या मते, “जेव्हा मराठी माणूस ओटीटीवरील साचेबद्ध कंटेट पाहून कंटाळतो, तेव्हा तो ताज्या दमाच्या अनुभवासाठी नाटकाकडे वळतो. म्हणूनच ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ सारखा हलका-फुलका आणि साहसी विषय प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरेल.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in