• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आता लोकल उशिरा धावणार नाही, प्रवाशांना मोठा दिलासा, काय आहे नवा प्लॅन?

February 5, 2026 by admin Leave a Comment


Mumbai Local Train: मध्य रेल्वेच्या कल्याण–ठाणे–CSMT या अत्यंत गर्दीच्या मार्गावर दररोज पीक अवर्सदरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. सकाळी ऑफिसच्या वेळेत लोकल गाड्या जर थोड्याही उशिराने धावल्या तर त्यानंतरची परिस्थिती ही आणखी बिकट होते. मात्र आता मध्य रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येवर महत्त्वाचा आणि गेमचेंजर ठरणारा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सकाळच्या वेळेत लोकल सेवा अधिक शिस्तबद्ध आणि वेळेवर होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकाचा थेट परिणाम अनेकदा मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेवर होताना दिसतो. त्यामुळे एखादी एक्सप्रेस गाडी उपनगरातील स्थानकाजवळून जात असताना सुरक्षिततेच्या कारणास्तव लोकल गाड्यांना सिग्नलवर थांबवावे लागते. त्यामुळे अनेकदा लोकल या उशिराने धावतात.

याचा सर्वाधिक फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला बसतो. लोकल उशिराने आल्यामुळे डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होते आणि प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेक वेळा लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावल्याने संपूर्ण वेळापत्रक कोलमडते.

पीक अवर्समध्ये एक्सप्रेसला उपनगराबाहेरच थांबा

अशातच आता या सर्व गोष्टींचा विचार करून या समस्येवर उपाय म्हणून मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पीक अवर्सदरम्यान लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांना थेट मुंबई उपनगरात प्रवेश करू दिला जाणार नाही. या गाड्यांना टिटवाळा, आसनगावसारख्या स्थानकांपूर्वीच थांबवण्यात येणार आहे.

टिटवाळा आणि आसनगाव येथून दररोज CSMT, दादर, कल्याण दिशेने अनेक लोकल गाड्या सुटतात. मात्र याच मार्गावरून उत्तरेकडून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या आल्याने लोकल सेवेत अडथळे निर्माण होतात. नव्या निर्णयामुळे एक्सप्रेस गाड्यांचा लोकलच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम टाळता येणार आहे.

थंडी आणि धुक्यामुळे होणाऱ्या विलंबावर तोडगा

सामान्यतः लांब पल्ल्याच्या गाड्या पहाटे 5 वाजण्यापूर्वी मुंबई उपनगरात दाखल होणे अपेक्षित असते. मात्र हिवाळ्यात उत्तर भारतात दाट धुके पडल्यामुळे या गाड्या अनेकदा 4 ते 5 तास उशिराने धावतात. त्यामुळे त्या थेट पीक अवर्समध्ये मुंबईत पोहोचतात आणि लोकल सेवेत मोठा खोळंबा होतो.

आता नव्या नियमानुसार, सकाळी 5 नंतर उपनगरात पोहोचणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना पीक अवर संपेपर्यंत मुंबईच्या वेशीवरच थांबवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना काहीसा विलंब सहन करावा लागणार असला तरी दररोज लाखो लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप; थेट भाऊच्या धक्क्यावर…
  • कार घेण्यापूर्वी ही बातमी वाचा, या वर्षी बाजारात येणार 6 उत्तम इलेक्ट्रिक SUV
  • प्रसिद्धीसाठी काय पण! हॉटेलमध्ये वेटरने मुलीसमोर अशी दाखवली क्रिएटिविटी पाहून तुम्हाला येईल संताप, Video प्रचंड व्हायरल
  • ‘…मग तुमची उदबत्ती पेटवा’, गोपीचंद पडळकरांचा गाण्यातून कोणाला इशारा?
  • Cricket : श्रेयसची खेळी व्यर्थ, रोहितच्या टीमचा 6 विकेट्सने विजय, सलग दुसरा सामना जिंकला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in