• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मध्य पूर्वेतील युद्ध कसे थांबणार ? खामेनेई यांच्या प्रतिनिधींनी TV9 शी केली बातचीत

March 24, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराणमध्ये सिजफायर व्हावी यासाठी व्हाईट हाईस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. या दरम्याने भारतातील इराणचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनेईंचे प्रतिनिधींनी युद्ध कसे रोखता येईल या संदर्भात TV9 भारतवर्षशी बोलताना विस्तृत सांगितले. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ‘या कार्यक्रमात बोलताना सर्वोच्च नेत्याचे प्रतिनिधी असलेल्या अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी म्हटले की अमेरिकेवर भरवसा करता येऊ शकत नाही त्यांचा इतिहास कलंकीत राहिलेला आहे.

इलाही यांच्या मते इराण युद्धविराम तेव्हाच करेन जेव्हा त्याच्यावर हल्ला होणार नाही. इराणवर जोपर्यंत अमेरिका आणि इस्राईलचा हल्ला होत राहील तोपर्यंत युद्ध संपू शकत नाही.

बलाढ्य देशांचा अहंकार तोडणे गरजेचे – इलाही

इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या प्रतिनिधी इलाही यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की असे कसे होऊ शकते की कोणताही कमजोर देश आहे ,त्याच्यावर ताकदवान देशाने हल्ला करावा ? जग हे का पाहात नाही ? आम्ही केवळ प्रत्युत्तर देत आहोत. आम्ही एकाही निर्दोषाचे रक्त वाहिलेले नाही.

इलाही यांच्या मते शांतता संपूर्ण जगासाठी गरजेची आहे. आम्हाला संपूर्ण मध्य पूर्वेत शांतता हवी आहे. लेबनॉन आणि गाझाचाही विषय घ्यावा, सिरीयाचाही विषय असावा. त्यांच्या जमीनीवर कोणी कब्जा केला आहे. त्यावरही चर्चा व्हायला हवी आहे.

मध्य पूर्वेत शांतता कशी येईल ?

इलाही म्हणाले की शांततेसाठी जगातील देशांनी आधी अमेरिकेवर दबाव आणावा. सर्वांनी हे निश्चित करायला हवे की येत्या काळात इराणवर कोणताही हल्ला होऊ नये. नुकसान झाले त्याची भरपाई द्यायला हवी. कारण इस्राईल आणि अमेरिकेने आमच्या शाळा नष्ट केल्या आहेत. हॉस्पिटल तोडले आहेत.

इलाही यांच्या मते इराण आपल्या प्रतिष्ठेशी तडजोड करणार नाही. आम्ही ते करु जे एक सार्वभौम राष्ट्र करते. बोलणी कशी होतील, हे सर्वाच्च नेते निश्चित करतील. परंतू इराणने सामंजस्य कराराची दशा आणि दिशा स्पष्ट केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Hormuz Crisis : जगाला दणका देणाऱ्या इराणने हॉर्मुज ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांकडून टोलपोटी आतापर्यंत किती लाख डॉलर्स वसूल केलेत?
  • तुरटीचा फक्त एक छोटा खडा, अन् उन्हाळ्यातील ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या
  • वायफाय देखील तुमचे भाग्य उजळवू शकतो, फक्त राउटर बसवताना या गोष्टी ठेवा लक्षात
  • Hormuz Crisis : युद्ध विरामानंतरही जग हादरलं, होर्मुजच्या सामुद्रधुनीत भयानक संकट, थेट जहाजच…
  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in