• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मऊ त्वचा मिळवण्यासाठी हळद, कडूलिंब आणि कोरफड जेलपासून घरच्या घरी बनवा नैसर्गिक साबण

February 3, 2026 by admin Leave a Comment


स्किन केअरचा विचार केला तर बाजारात हजारो प्रोडक्ट आहेत. त्वचेच्या स्वच्छतेसाठी असंख्य ब्रँडचे साबण आणि फेस वॉश उपलब्ध आहेत. पण काहीजण हे महागडे प्रोडक्ट वापरून देखील नंतर तक्रार करतात की साबण आणि फेस वॉश वापरल्यानंतर त्यांची त्वचा कोरडी होते. ऐवढेच नाही तर असे काही साबण देखील आहेत जे लोकं त्यांचा रंग उजळवण्यासाठी अधिक वापर करतात. पण या साबणामध्ये वापरले जाणारे केमिकल हे त्वचेसाठी अनेक समस्या निर्माण करणारे ठरू शकतात. अशातच तुम्हाला बदलत्या ऋतुत आणि वातावरणात त्वचा चमकदार आणि मुलामय हवीये तर तुम्ही घरी नैसर्गिक पद्धतीने कोणत्याही दुष्परिणामाशिवाय साबण देखील बनवू शकता, जे केवळ तुमची त्वचा मऊ ठेवणार नाही तर त्वचेच्या अनेक समस्या टाळण्यास देखील मदत करेल.

घरी तुम्ही एक साबण बनवू शकता जो तुम्ही एकाच घटकांपासून अनेक साबण बनवू शकता. शिवाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार नैसर्गिक घटक आणि सुगंधाचा वापर करू शकता. तर तुम्ही घरी साबण कसा बनवू शकता ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.

2 ते 3 चमचे बदाम किंवा नारळाचे तेल, 1 चमचा ग्लिसरीन,2 चमचे कोरफड जेल, 1/2 चमचा हळद, 8 ते 10 कडुलिंबाची पाने आणि मूठभर गुलाबाच्या पाकळ्या लागतील. सुगंधासाठी तुम्ही आवश्यक तेले वापरू शकता. तुम्ही टी ट्री ऑईल किंवा लैव्हेंडर, तुम्हाला आवडणारा कोणताही सुगंध निवडू शकता. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अंदाजे 250 ग्रॅम साबणाचा बेस.

साबण कसा बनवायचा?

प्रथम कडुलिंबाची पाने बारीक वाटून पेस्ट बनवून घ्या आणि आता ही पेस्ट कॉटनच्या कापडात ठेवा आणि त्यातून रस पिळून घ्या. तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पावडर देखील वापरू शकता.

त्याचप्रमाणे तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या बारीक वाटून त्याचा रस काढू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर बनवू त्याचाही वापर करू शकता.

आता गॅसवर एका पॅनमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि साबणाच्या बेसचे छोटे तुकडे करा, नंतर डबल बॉयलर पद्धतीने तुम्हाला साबणाचा बेस वितळवा.

आता वितळलेल्या साबणाच्या बेसमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा रस किंवा पावडर टाका. त्यात कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा पावडर टाकून मिश्रण चांगले मिक्स करा.

आता तुम्हाला त्यात कोरफडीचे जेल, बदाम किंवा नारळाचे तेल, ग्लिसरीन आणि हळद घालून चांगले मिसळावे लागेल जेणेकरून कोणताही घटक एकाच ठिकाणी जमा होणार नाही.

शेवटी तुम्हाला साबणाच्या बेसमध्ये आवश्यक तुमच्या आवडीचे सुगंधीत तेले टाका जे तुमच्या साबणाला नैसर्गिक सुगंध देतील आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

तयार मिश्रण सिलिकॉन साबणाच्या साच्यात टाका आणि काही तास तसेच राहू द्या जेणेकरून साबण चांगला घट्ट होईल.

तुमचा साबण व्यवस्थित सेट झाला की, तो साच्यातून बाहेर काढा आणि तो साबण वापरण्यासाठी तयार होईल.

साबणामुळे अनेक फायदे होतील

या साबणात बदाम आणि नारळ सारख्या तेलांचा वापर केल्याने तुमच्या त्वचेला पोषण देते. कोरफड तुमच्या त्वचेला हायड्रेट करते आणि ग्लिसरीन देखील त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते. तर या साबणात वापरलेली हळद तुमचा रंग उजळवण्यास मदत करते आणि कडुलिंब बुरशीजन्य संसर्ग रोखण्यास मदत करते. गुलाब तुमची त्वचा ताजी ठेवण्यास मदत करतो. हा साबण तुम्हाला नैसर्गिकरित्या चमकदार आणि मऊ त्वचा मिळविण्यात मदत करेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • Maharashtra News LIVE : लवकरच ‘ऑपरेशन टायगर’? दरेगावातून एकनाथ शिंदे सक्रीय
  • Dhurandhar 2 : नजर काढा, मूठभर लाल मिर्चीने भागणार नाही तर..धुरंधर 2 पाहिल्यानंतर बॉलिवूडच्या मोठ्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
  • Dhurandhar 2 Collection : ‘धुरंधर 2’ सिनेमाला मोठा झटका, ‘हे’ लक्ष्य गाठणं कठीण, काय सांगतायेत आकडे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in