
मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेडिकल दुकानदारांकडून लाच घेण्यासाठी एक सिक्रेट कोड वापरला जात होता, असा आरोप आहे. झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर हे गंभीर आरोप झाले आहेत.
मेडिकल चालकांकडून पैशांची मागणी करताना, कागदपत्रांवर एक रेष मारल्यास ५० हजार रुपये, दोन रेषा मारल्यास एक लाख रुपये आणि तीन रेषांसाठी दीड लाख रुपये घेतले जात असत. या कोडवर्डद्वारे लाच मागितल्याचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, दोषींवर कारवाई करण्याचे आणि सत्य बाहेर आणण्याचे आश्वासन दिले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र त्यांना या प्रकरणाची कल्पना नसल्याचे सांगितले आहे.
Leave a Reply