• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या

April 9, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अधिपती असलेल्या मंगळाचे भ्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते. या ग्रहाचे परिवर्तन नेहमी प्रत्येक राशीत उत्साह आणि ऊर्जा आणते. मंगळ हा धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वासाचा घटक मानला जातो. मंगळाच्या हालचालीतील बदलाचा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर थेट परिणाम होतो. अशातच 2 एप्रिल रोजी मंगळ कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केलेला आहे. तर मंगळ हा ग्रह 11 मे पर्यंत मीन राशीत भ्रमण करणार आहे. मीन राशीतील मंगळाचे हे भ्रमण काही राशींसाठी भाग्याचे द्वार उघडू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा तीन राशींबद्दल जाणून घेऊया ज्यांना या भ्रमणामुळे मोठा फायदा होऊ शकतो.

मेष रास

मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे मंगळाच्या संक्रमणाचे सकारात्मक परिणाम मेष राशीवर दिसून येऊ शकतात. या राशीच्या लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. तसेच कठीण निर्णयदेखील निर्भयपणे घेऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्यांच्या कामाबद्दल प्रशंसाही मिळू शकते.

मिथुन रास

मंगळाचे संक्रमण मिथुन राशीच्या व्यक्तींचा सामाजिक दर्जा वाढवू शकते. मंगळाची ऊर्जा या राशीच्या लोकांना त्यांची ध्येये साध्य करण्यास मदत करू शकते. तसेच व्यावसायिकांना नफ्याचे नवीन स्रोत सापडू शकतात. तर एक मोठा करार निश्चित होऊ शकतो. या भ्रमणाच्या परिणामामुळे तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकता. भावंडांमधील नातेसंबंध सुधारू शकतात. तसेच या राशीच्या लोकांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळू शकतो.

वृश्चिक रास

मंगळ वृश्चिक राशीचाही स्वामी आहे. मंगळाचे हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरू शकते. कारण या भ्रमणामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला अधिक उत्साही वाटू शकते आणि तुमचे विचार अधिक स्पष्ट होऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in