• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंगळवारी बँका असणार बंद! पाच दिवसाचा आठवडा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप

January 26, 2026 by admin Leave a Comment


पाच दिवसांचा आठवडा करण्याचा नियम लागलीच लागू करण्यासह अन्य मागण्यासाठी यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स (यूएफबीयू)यांनी उद्या २७ जानेवारीला राज्यभरातील बँकांचा संप पुकारल्याने सरकारी बँकांच्या कामकाज प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ९ संघटनांच्या संयुक्त समिती असलेल्या यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (यूएफबीयू)संपाचे आव्हान केले आहे. २३ जानेवारी रोजी श्रम आयुक्तांशी झालेली बोलणी फिस्कटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २५ जानेवारी (रविवार ), २६ जानेवारी ( प्रजासत्ताक दिन ) बँका बंद होत्या. त्यामुळे आता मंगळवारी संपामुळे ग्राहकांचे हाल होणार आहेत.

संघटनांचे म्हणणे काय ?

या बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतरही आमच्या मागण्यांवर कोणतेही आश्वासन मिळाले नाही.यासाठी आम्ही संप करण्यास मजबूर झालो आहोत असे यूएफबीयूचा घटक असलेल्या अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ (एआयबीयए) चे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले. मार्च २०२४ मध्ये वेतन सुधारणा करारानुसार इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) आणि यूएफबीयू यांच्या दरम्यान सर्व शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर करण्यावर सहमती झाली होती असे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआयबीओसी) चे महासचिव रुपम रॉय यांनी सांगितले.

खाजगी बँकांवर परिणाम नाही

भारतीय स्टेट बँक (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ बडोदा सह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखामध्ये रोख जमा, पैसे काढणे, चेक वटवणे आणि प्रशासकीय कामांवर परिणाम होणार आहे.मात्र, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एक्सिस बँक अशा खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँकांच्या कामांवर परिणाम होणार नाही असे म्हटले जात आहे. कारण या बँकांच्या संघटनांनी संपात सहभाग घेतलेला नाही.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार… कसा रचला घटनेचा कट? आरोपी… स्कूटी… 4 महिन्यांपूर्वी काय शिजलेलं?
  • Maharashtra Election News LIVE : मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी शितल तेजवानीविरोधात आरोपपत्र दाखल
  • मऊ त्वचा मिळवण्यासाठी हळद, कडूलिंब आणि कोरफड जेलपासून घरच्या घरी बनवा नैसर्गिक साबण
  • जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला, कोणाची वर्णी?
  • भाजपा आज घेणार मोठा निर्णय, पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर अखेर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in