• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भोंदू अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे, मोठी माहिती, आजही एसआयटीकडून..

March 25, 2026 by admin Leave a Comment


नाशिकचा भोंदू अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात थेट भोंदूचे कारनामेच वाचून दाखवले. आता चारही बाजूंनी भोंदू अशोक खरात फसला. त्याचे काही धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत. पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत या भोंदूला अटक केली. महिलांवर अत्याचार करतानाचे त्याचे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ पोलिसांकडे आहेत. बड्या अधिकारी आणि नेत्यांसोबत त्याचे जवळचे संबंध आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकरणकर आणि भोंदू अशोक घरात यांचे अत्यंत जवळचे संबंध होते, रूपाली चाकणकर अशोक खरात यांचे पाय धुवत असल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. या प्रकरणात थेट काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आल्याने रूपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा थेट राजीनामा देण्याची वेळ आली. रूपाली चाकणकर यांच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले.

भोंदू अशोक खरात याचे काही धक्कादायक असे व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, भोंदू अशोक खरात याला मदत करणाऱ्या एकलाही सोडणार नाही. यादरम्यानच आता अशोक खरात याच्या समस्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग सातव्या दिवशी चौकशी सुरू आहे.

गोपनीय ठिकाणी SIT कडून चौकशी केली जात आहे. SIT प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांच्या उपस्थितीत चाैकशीला सुरूवात झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 10 वाजता चौकशीला सुरुवात झाली. कालच नाशिक न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आणि भोंदूचा पोलिस कस्टडीमधील काळ वाढला आहे.

न्यायालयाकडून कस्टडी मिळताच दुसऱ्याच दिवशी चौकशीचा वेग वाढवला आहे. SIT ला अजून बऱ्याच गोष्टींची विचारपूस या भोंदूकडे करायची आहे. लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कवर फोकस करून SIT कडून सखोल चौकशी सुरू आहे. खरात प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in