• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भोंदूबाबा अशोक खरात याचे सरकारी साटेलोटे, खरातच्या मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीचा जमीन व्यवहार

March 22, 2026 by admin Leave a Comment


भोंदू बाबा अशोक खरात याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या कार्यालयातील अनेक महिलांसोबतचे किळसवाणे व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरात याने आपण दैवी आशीवार्द देतो असे भासवून अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. खरात याने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जमीनी लाटल्याचे उघडकीस आले आहे. उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांचे एक प्रकरण माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघडकीस आणले आहे. यात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीच्या नावे २०२२ मध्ये नाशिक येथील जमीन खरेदी झाली आहे. मात्र ही जमीन आरोपी अशोक खरात याच्या मुलीच्या सोबत खरेदी करण्यात आली आहे. याचा अर्थ शासनातले बरेचसे अधिकारी खरात याच्या सोबत जमिनीचे व्यवहार करत असावेत असा संशय आहे. उपजिल्हाधिकाऱ्याकडे जमीनीच्या अधिग्रहणाचे काम असते. त्यामुळे असे व्यवहार बेमालूमपणे होत असावेत. उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील कल्याण येथे असतानाही त्यांच्यावर आरोप झाले होते. मात्र, त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही असेही माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in